कोरोना डेथ ऑडिट; ३६ टक्के रुग्णांना आधीपासूनच आजार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:14 AM2021-06-18T04:14:56+5:302021-06-18T04:14:56+5:30

लातूर : जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार ३७० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, यातील ३६ टक्के रुग्णांना आधीपासूनच वेगवेगळे आजार ...

Corona Death Audit; 36% of patients already sick! | कोरोना डेथ ऑडिट; ३६ टक्के रुग्णांना आधीपासूनच आजार !

कोरोना डेथ ऑडिट; ३६ टक्के रुग्णांना आधीपासूनच आजार !

Next

लातूर : जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार ३७० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, यातील ३६ टक्के रुग्णांना आधीपासूनच वेगवेगळे आजार होते, तर सहव्याधी नसलेल्या ६४ टक्के रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूमध्ये महिलांपेक्षा पुरुषांचे प्रमाण अधिक आहे. एकूण २३७० मृतांपैकी ८४४ महिला तर १५२६ पुरुष आहेत.

दरम्यान, कोरोनासह सहव्याधी असलेल्या ८४८ जणांचा मृत्यू झाला असून, १५२२ जणांना कोरोनाव्यतिरिक्त अन्य आजार नसल्याचे आरोग्य विभागाने केलेल्या विश्लेषणात नमूद करण्यात आले आहे. ५० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या ४३३, ५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ४३०, ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ७०५ आणि ७० वयापेक्षा अधिक वय असलेल्या ८०२ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. शुगर, रक्तदाब आदी सहव्याधी असलेल्या ३६ टक्के रुग्णांचा यामध्ये मृत्यू झाला असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे. दवाखान्यात दाखल केल्यानंतर पहिल्याच दिवशी २९३, १ ते ५ दिवसांमध्ये ११७०, सहा ते दहा दिवसांमध्ये ५८५ आणि दहा दिवस उपचार घेतल्यानंतर ३७६ जणांचा मृत्यू झाला आहे.

उपचाराच्या २४ तासांमध्ये २३९ जणांचा मृत्यू

दवाखान्यात दाखल केल्यानंतर उपचार सुरू असताना २४ तास उपचार घेतल्यानंतर २३९ जणांचा मृत्यू झाला आहे, तर एक ते पाच दिवस झाल्यानंतर ११७० जणांचा, सहा ते दहा दिवसांच्या उपचारादरम्यान ५८५ आणि दहा दिवसांपेक्षा अधिक दिवस उपचार घेतल्यानंतर ३७६ जणांचा मृत्यू झाला आहे.

सहव्याधीपेक्षा कोरोनामुळेच अधिक मृत्यू

सहव्याधी असलेल्या ३६ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर ६४ टक्के रुग्णांना सहव्याधी नव्हत्या. म्हणजे शुगर, रक्तदाब व उच्च रक्तदाबाचे आजार नव्हते किंवा अन्य आजारही नव्हते.

एकूण २३७० मृतांमध्ये १५२६ पुरुषांचे मृत्यू झाले आहेत, तर ८४४ महिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुरुषांच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे.

Web Title: Corona Death Audit; 36% of patients already sick!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.