कोरोनामुळे सौंदर्य प्रसाधन विक्रेते, ब्युटी पार्लर चालकांवर आर्थिक संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:14 IST2021-04-29T04:14:42+5:302021-04-29T04:14:42+5:30

लातूर : कोणताही कार्यक्रम असो किंवा खरेदीसाठी बाहेर जाणे असो, स्त्रिया मेकअप केल्याशिवाय दरवाजाही ओलांडत नाहीत. गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे ...

Corona causes financial crisis on cosmetics sellers, beauty parlor operators | कोरोनामुळे सौंदर्य प्रसाधन विक्रेते, ब्युटी पार्लर चालकांवर आर्थिक संकट

कोरोनामुळे सौंदर्य प्रसाधन विक्रेते, ब्युटी पार्लर चालकांवर आर्थिक संकट

लातूर : कोणताही कार्यक्रम असो किंवा खरेदीसाठी बाहेर जाणे असो, स्त्रिया मेकअप केल्याशिवाय दरवाजाही ओलांडत नाहीत. गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे बाहेर खरेदीसाठी जाणे किंवा कार्यक्रमास उपस्थित राहणे जमत नाही. त्यातच बाहेर जावे लागले तर तोंडावर मास्क लावावा लागत असल्यामुळे लिपस्टिक लावूनही उपयोग नाही. परिणामी, या कोरोनामुळे मास्कने लिपस्टिकची लाली घालविली असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, या कारणांमुळे सौंदर्य प्रसाधन विक्रेते तसेच ब्युटी पार्लर चालकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. अनेकांनी तर भाडे करारावर ब्युटी पार्लर सुरू केले आहे. संचारबंदीमुळे दुकाने बंद आहेत. परिणामी, दुकानाचे भाडे कसे देणार, असा प्रश्न ब्युटी पार्लर चालकांकडून उपस्थित होत आहे. गेल्या वर्षभरापासून लग्नसराई, इतर कार्यक्रमांवर बंधने घालण्यात आली आहेत. अनेकवेळा लाॅकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता मनसोक्त खरेदीसाठी महिलांना घराबाहेर पडताच आले नाही. सण-उत्सवही घरच्या घरीच अत्यंत साधेपणाने साजरे करावे लागले आहे. त्यामुळे मेकअप आणि लिपस्टिकचा विषयच उरला नाही. परिणामी, सौंदर्य प्रसाधने विक्री करणारे आणि ब्युटी पार्लर चालकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

लातूर शहरात जवळपास पाचशेहून अधिक ब्युटी पार्लर आहेत. दर महिन्याकाठी सौंदर्य प्रसाधनाच्या होलसेल दुकानातून लाखो रुपयांची उलाढाल होते. मात्र संचारबंदीमुळे हे सर्व व्यवहार बंद आहेत.

गेल्या वर्षभरापासून ब्युटी पार्लर व्यवसायाला अवकळा आली आहे. उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये विवाह समारंभ असतात. त्यावेळी वधूच्या मेकअपसाठी बोलावले जाते. मात्र मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत विवाह होत असल्याने हा हंगामही हातून गेला आहे. त्यामुळे ब्युटी पार्लरचा व्यवसाय अडचणीत आला आहे.

- मधुरा कोयले, ब्युटी पार्लर चालक

घरीच राहावे लागते

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे घराबाहेर जाणे बंदच आहे. घराबाहेर जरी जाणे झाले तर किरकोळ साहित्य खरेदीसाठी. तोंडाला मास्क लावावा लागत आहे. त्यामुळे ब्युटी पार्लरकडे जाणे बंदच झाले आहे. सौंदर्य प्रसाधनाचे साहित्यही खरेदी केले नाही. - सृष्टी पवार

Web Title: Corona causes financial crisis on cosmetics sellers, beauty parlor operators