वयाच्या पुराव्याबाबत निराधारांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:20 AM2021-05-09T04:20:32+5:302021-05-09T04:20:32+5:30

माजीमंत्री दिलीपराव देशमुख, पालकमंत्री अमित देशमुख, आ. धिरज देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार लातूर ग्रामीण संगांयो समितीचे अध्यक्ष प्रवीण पाटील, लातूर ...

Consolation to the destitute about proof of age | वयाच्या पुराव्याबाबत निराधारांना दिलासा

वयाच्या पुराव्याबाबत निराधारांना दिलासा

Next

माजीमंत्री दिलीपराव देशमुख, पालकमंत्री अमित देशमुख, आ. धिरज देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार लातूर ग्रामीण संगांयो समितीचे अध्यक्ष प्रवीण पाटील, लातूर शहर अध्यक्ष हकीम शेख यांनी निराधारांच्या अडचणी दूर करण्याची मागणी आढावा बैठकीत केली होती. या मागणीची शासनाने दखल घेतली असून योजनेच्या लाभार्थ्यांना ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिकेतील जन्मनोंद असलेली साक्षांकित प्रत, शाळा सोडल्याचा दाखला, शिधापत्रिका, मतदान ओळखपत्र, आधारकार्ड यापैकी कोणताही एक वयाचा पुरावा ग्राह्य धरला जाणार आहे. यापैकी कोणताही पुरावा नसल्यास ग्रामीण, नागरी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेला वयाचा दाखलाही ग्राह्य धरला जाणार आहे. यामुळे ग्रामीण व शहरी भागातील लोकांची शासकीय वैद्यकीय रुग्णालयात जाण्यासाठी गैरसोय व वेळ वाचला आहे. या निर्णयाचे समितीचे सदस्य भालचंद्र सोनकांबळे, अंजनी चिंताले, बंडू सोळंकर, फारूख शेख, मनोज देशमुख, बरकत शेख, राहुल रोडे, ॲड. नरेश कुलकर्णी, दगडु मिटकरी, अमोल देडे, शीतल राजकुमार सुरवसे, धनंजय वैद्य, हरीश बोळंगे, अमोल भिसे, संजय चव्हाण, परमेश्वर पवार, रमेश पाटील व आकाश कणसे आदींनी स्वागत केले आहे.

निराधारांसाठी दिलासादायक निर्णय...

या निर्णयामुळे निराधारांना दिलासा मिळाला आहे. आर्थिक व मानसिक अडचणी दूर करणारा हा निर्णय असून, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, पालकमंत्री अमित देशमुख, आ. धीरज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त निराधारांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

- प्रविण पाटील,

संगायो, लातूर ग्रामीण अध्यक्ष

Web Title: Consolation to the destitute about proof of age

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.