शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

लातूरच्या बाजारात चायनीज मांजा ; विक्रीमुळे वाढला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:17 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क लातूर : शहरासह जिल्हाभरात मकरसंक्रांत, वेळाअमावास्यानिमित्त पतंग व मांजाची खेरदी-विक्री माेठ्या प्रमाणात वाढते. लातूरच्या बाजारात चायनीज ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

लातूर : शहरासह जिल्हाभरात मकरसंक्रांत, वेळाअमावास्यानिमित्त पतंग व मांजाची खेरदी-विक्री माेठ्या प्रमाणात वाढते. लातूरच्या बाजारात चायनीज मांजा विक्रीसाठी दाखल झाला असून, हा मांजा यंदाही पक्ष्याच्या जीवावर बेतणार असल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी मांजाने अनेक पक्ष्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर काही व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत.

शासनाने चायनीज मांजावर बंदी घातली असून, ताे सर्रासपणे विकला जात आहे. हा मांजा स्वत:सह इतरांच्या जीवावर बेतणारा आहे. यासाठी आता पतंग उडविताना खबरदारी घ्यावी लागणार आहे. दरम्यान, अनेकदा प्रवास करणाऱ्या माेटारसायकलवरील व्यक्ती या मांजाने गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत अधिक गंभीरपणे विचार करण्याची गरज असल्याचे पक्षिमित्र, पर्यावरणतज्ज्ञांनी सांगितले. बाजारात शासनाकडून नाॅयलन आणि चायनीज मांजावर बंदी घातली आहे. असे असले तरी हा प्राणघातक मांजा बाजारात सहज उपलब्ध हाेत आहे. या चायनीज मांजामुळे लहान मुलांचे हात कापणे, बाेटांना इजा पाेहोचणे. शिवाय, अनेकांच्या गळ्याला मांजा लागल्याने गंभीर जखमी हाेण्याच्या घटना घडत आहेत. पतंग उंचावर गेल्यावर मांजा पक्ष्यांना दिसत नाही. पक्ष्यांचा विहार सुरू असताना अचानक त्यांच्या पक्ष्यांना मांजा अडकताे. काही पक्ष्यांच्या पायाला मांजा अडकणे तर काहींचा गळा मांजामुळे कापला जाणे असे प्रकार दरवर्षी शेकडाेंच्या संख्येने घडतात. जानेवारी ते डिसेंबरअखेर मांजाने जखमी हाेणाऱ्या पक्ष्यांची संख्या २७८ आहे. तर तब्बल १२७ अपघात झाले आहेत. यातून ४७ व्यक्ती जखमी झाले आहेत.

चायनीज मांजा विकणाऱ्यांवर हाेणार दंडात्मक कडक कारवाई

लातूर शहर आणि जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर, निलंगा, औसा शहरातील बाजारपेठेत चायनीज मांजा विक्रीप्रकरणी कडक करावाई करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी रविवारी थेट आदेश जारी केले आहेत. संबंधित विक्रेत्यांवर आता थेट दंडात्मक कारवाईसह गुन्हेही दाखल केले जाणार आहेत.