शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सावधान डेंग्यूची रुग्णसंख्या वाढली, चिकुनगुनियाही हातपाय पसरताेय..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:21 IST

लातूर जिल्ह्यात डेंग्यूची रुग्णसंख्या अलीकडे वाढली आहे. प्रत्येक तालुक्यात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. एडिस इजिप्ती डास डेंग्यू आजारासाठी ...

लातूर जिल्ह्यात डेंग्यूची रुग्णसंख्या अलीकडे वाढली आहे. प्रत्येक तालुक्यात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. एडिस इजिप्ती डास डेंग्यू आजारासाठी कारणीभूत ठरत आहे. शिवाय, अनेक दिवसांनंतर जिल्ह्यात चिकुनगुनियाचे रुग्णही आढळून येत आहेत. ताप येणे, थंडी वाजण्याचे प्रकार बहुतांश रुग्णांमध्ये दिसून आले आहे. हे आजार डासांपासून हाेणारे आहेत. त्यासाठी टेमिफाॅस ॲक्टिव्हिटी राबविली जात आहे. याशिवाय, फाॅगिंग मशीनचा वापरही करण्यात येत आहे. ग्रामीण भागात आराेग्य विभाग आणि ग्रामपंचायत प्रशासनाकडून फाॅगिंग मशीनच्या माध्यमातून डेंग्यूला राेखण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

जिल्हाभरात डेंग्यूच्या रुग्णांत वाढ...

हा आजार प्रामुख्याने लहान मुलांमध्ये वाढल्याचे समाेर आले आहे. त्यापाठाेपाठ माेठ्या आणि वृद्धामध्येही वाढल्याचे दिसून आले आहे. दरराेज किमान दाेन ते तीन रुग्णांचा अहवाल पाॅझिटिव्ह येत आहे. शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयात डेंग्यूचे रुग्ण दिसून येत आहेत.

लहान मुलांचे प्रमाण...

हिवताप विभागही डेंग्यू राेखण्यासाठी सध्या प्रयत्नशील आहे. याबाबत त्यांच्याकडून आकडेवारी संकलित करण्याचे काम सुरू आहे.

डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये लहान मुलांची संख्या अधिक असल्याचे समाेर आले आहे.