शेतातील रस्त्यावरून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:18 IST2021-04-14T04:18:18+5:302021-04-14T04:18:18+5:30

लातूर : शेतात जेसीबीने रस्ता का तयार करीत आहात, असे विचारले असता आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ केली. तसेच काठीने मारून ...

Beating from the farm road | शेतातील रस्त्यावरून मारहाण

शेतातील रस्त्यावरून मारहाण

लातूर : शेतात जेसीबीने रस्ता का तयार करीत आहात, असे विचारले असता आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ केली. तसेच काठीने मारून जखमी केल्याची घटना बोंबळी (खु.) शिवारात घडली.

फिर्यादीच्या शेतात जेसीबीने रस्ता का तयार करीत आहात, असे विचारले असता फिर्यादीला काठीने मारून जखमी केले. जिवे मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद प्रशांत रोहिदास भोसले (रा. बोंबळी खु., ता. देवणी) यांनी दिली. त्यावरून कालिदास देविदास भोसले व अन्य तिघांविरुद्ध देवणी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास स.पो.फौ. डप्पडवाड करीत आहेत. लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच डाव्या हाताच्या बोटावर काठीने मारले.

कपिलनगरात अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था

लोकमत न्यूज नेटवर्क

लातूर : शहरातील कपिलनगर भागात अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. जागोजागी सिमेंट रस्तेही उखडले आहेत. नालेही नियमित साफ केले जात नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.

नालेसफाई व अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

Web Title: Beating from the farm road