संगनमत करून मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:20 IST2021-04-27T04:20:01+5:302021-04-27T04:20:01+5:30

मीटरचे वायर तोडल्याच्या कारणावरून मारहाण लातूर : फिर्यादी व त्यांचा मुलगा, पत्नीने ‘तू आमच्या घराच्या मीटरचे वायर का तोडलेस,’ ...

Beating by conspiracy; Charges filed against the four | संगनमत करून मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

संगनमत करून मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

मीटरचे वायर तोडल्याच्या कारणावरून मारहाण

लातूर : फिर्यादी व त्यांचा मुलगा, पत्नीने ‘तू आमच्या घराच्या मीटरचे वायर का तोडलेस,’ अशी विचारणा केल्याच्या कारणावरून त्यांना मारहाण केल्याची घटना कवठाळी (ता.चाकूर) येथे घडली. याबाबत गणपती तुकाराम केंचे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंढरी रामदास बुदडे (रा.कवठाळी, ता. चाकूर) यांच्याविरुद्ध चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोना. थोरमोटे करीत आहेत.

बांधकाम साइटवरील विद्युत वायरची चोरी

लातूर : मुक्ताईनगर अंबेजोगाई रोडवरील बांधकाम साइटवर ठेवलेल्या विद्युत वायरची चोरी झाल्याची घटना २५ एप्रिल रोजी घडली. याबाबत विश्वजीत त्र्यंबकराव भिसे (रा.देशपांडे कॉलनी) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. भताने करीत आहेत.

Web Title: Beating by conspiracy; Charges filed against the four