शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नळेगावात जिल्हा बँक फोडण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:25 IST

नळेगाव (जि. लातूर) : चाकूर तालुक्यातील नळेगाव येथील लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा गॅस कटरच्या सहाय्याने फोडून चोरी करण्याचा ...

नळेगाव (जि. लातूर) : चाकूर तालुक्यातील नळेगाव येथील लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा गॅस कटरच्या सहाय्याने फोडून चोरी करण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नळेगाव येथे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आहे. नेहमीप्रमाणे शनिवारी बँक बंद करण्यात आली. दरम्यान, शनिवारी रात्री ते सोमवारी पहाटेपर्यंतच्या कालावधीत चोरट्यांनी बँकेच्या उत्तर बाजूला असलेल्या खिडकीचा लोखंडी गज गॅस कटरच्या सहाय्याने कापून आत प्रवेश केला. त्यानंतर बँकेच्या खोलीचा दरवाजाही गॅस कटरच्या सहाय्याने कापला आणि बँकेच्या मुख्य खोलीत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरट्यांना त्यात यश आले नाही.

नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी बँकेचे सेवक कमलाकर देशमुख यांनी बँकेचा मुख्य दरवाजा उघडून आतमध्ये प्रवेश केला, तेव्हा त्यांना चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी ही माहिती वरिष्ठांना कळवली. बँकेचे शाखाधिकारी लिंबाजी मस्के यांच्या फिर्यादीवरून चाकूर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेडकाॅन्स्टेबल डी. टी. शिरसाट करत आहेत.

सोबतचे साहित्य टाकले बँकेत...

चोरटे बँक फोडण्यासाठी सोबत आणलेली गॅसची टाकी, छोटे गॅस सिलिंडर, गॅस कटर, मोठे लोखंडी रॉड व इतर साहित्य बँकेतच टाकून पसार झाले. घटनास्थळाला पोलीस निरीक्षक बालाजी मोहिते यांनी भेट देऊन पाहणी केली.

श्वानपथक दाखल...

यातील चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी सोमवारी दुपारी घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण केले. यावेळी श्वानांनी मुख्य रस्त्यापर्यंत मार्ग दाखवला. ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते.