उदगिरात आणखीन ६७ कोरोनाबाधित आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:18 IST2021-05-01T04:18:30+5:302021-05-01T04:18:30+5:30

येथील कोविड रुग्णालयात शुक्रवारी आरटीपीसीआर तपासणीत १८, तर अँटिजन तपासणीत ४९ बाधित आढळले आहेत. इतर ठिकाणांहून १६ रुग्ण उपचारासाठी ...

Another 67 corona were found in Udgira | उदगिरात आणखीन ६७ कोरोनाबाधित आढळले

उदगिरात आणखीन ६७ कोरोनाबाधित आढळले

येथील कोविड रुग्णालयात शुक्रवारी आरटीपीसीआर तपासणीत १८, तर अँटिजन तपासणीत ४९ बाधित आढळले आहेत. इतर ठिकाणांहून १६ रुग्ण उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. यशस्वी उपचारानंतर २० जणांना घरी सोडण्यात आले. कोविडबाधित ५, तर नॉनकोविड दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सध्या कोविड रुग्णालयात ८९, होम आयसोलेशनमध्ये ९०, तोंडार पाटी येथील कोविड केअर सेंटर येथे ४४, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर संस्थेत ३२, पशुवैद्यकीय महाविद्यालय येथे २४, तोंडार पाटी येथील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर येथे ४८, जयहिंद मुलांचे वसतिगृह येथे १२ आणि विविध खाजगी कोविड रुग्णालयांत ४४, अशा एकूण ३८३ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश हरिदास यांनी दिली.

Web Title: Another 67 corona were found in Udgira