शहरं
Join us  
Trending Stories
1
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
2
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
3
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
4
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
5
झाडावर कसा चढतो साप? व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क, तुम्ही कधी बघितलं का?
6
Latest Marathi News LIVE: दाऊदचा 'खास' सलीम डोला याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
7
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
8
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
9
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
10
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
11
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
12
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
13
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
14
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
15
काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
16
नवी ७-सीटर इलेक्ट्रिक SUV Lexus 'TZ' लाँच; ५३० किमी रेंज, अवघ्या ३५ मिनिटांत होणार चार्ज! बघा फीचर्स
17
"आम्हाला काँग्रेसपासून वेगळं बसवा"; कनिमोझींचं थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र; तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप
18
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
19
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
20
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
Daily Top 2Weekly Top 5

सलग दोन हंगाम गेल्याने कुस्तीगीर हवालदिल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:18 IST

महेश पाळणे लातूर : कुस्तीच्या आखाड्यातून आपले कौशल्य दाखवीत अनेक मल्ल मैदान गाजवतात. या मैदानातून मिळालेली जमापुंजी ते ...

महेश पाळणे

लातूर : कुस्तीच्या आखाड्यातून आपले कौशल्य दाखवीत अनेक मल्ल मैदान गाजवतात. या मैदानातून मिळालेली जमापुंजी ते आपल्या खुराकासाठी खर्च करतात. कोरोनाच्या संकटामुळे गतवर्षीही यात्रा, जत्रांचे आखाडे रंगले नाहीत. यंदाच्या वर्षीही असेच चित्र आहे. त्यामुळे आखड्याबाहेरच कुस्तीगीर ‘चीतपट’ झाल्याचे दिसून येत आहे.

लातूर जिल्ह्याला कुस्तीची परंपरा आहे. जिल्ह्यातील रुई रामेश्वर, रामलिंग मुदगड, अलमला, उदगीर, जळकोट, शिवणी, भुसनी व लातूरसह जिल्ह्यातील अनेक गावांत कुस्तीगिरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या सर्व तालमीत जवळपास दोन ते अडीच हजार मल्ल दैनंदिन सराव करतात. जत्रा, यात्राच्या माध्यमातून होणाऱ्या स्पर्धेतून ते आपली उपजीविका भागवितात. कोरोनामुळे गेल्यावर्षी व यंदाच्या वर्षी आखाडे रंगले नाहीत. त्यामुळे पैलवान कसा जगणार, असा प्रश्न कुस्ती क्षेत्रात पडला आहे. जिल्ह्यात रुई रामेश्वर, सिद्धेश्वर यात्रा, खाडगावचा उरूस, खंडोबा यात्रा, हनुमान जयंती, रामनवमी, गुढीपाडवा आदी सणांसह अनेक छोट्या-मोठ्या गावांत कुस्त्यांची दंगल होते. काेरोनामुळे यात्रातील आखाडे बंद आहेत. या कारणाने कुस्तीगिरांचे आर्थिक स्रोत बंद पडले आहेत. परिणामी, कुस्तीगीर आर्थिक संकटात सापडले आहेत. एकतर सराव नसल्याने अंगाला अंग लागत नाही त्यातच स्पर्धाही नसल्याने कुस्तीगिरांसमोर इकडे आड तिकडे विहीर असा पेच निर्माण झाला आहे. खुराकासाठी घरच्या समोर किती वेळा हात पसरावे याचीही मल्लांना धास्ती लागली आहे. राज्य सरकारने या बाबीकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे कुस्तीगिरांतून बोलले जात आहे.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेवर कोरोनाचे सावट...

कोरोनामुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धा कधी होणार, असा प्रश्न कुस्तीगिरांना पडला आहे. गतवर्षी उपविजेता ठरलेला लातूरचा शैलेश शेळके यंदाच्या स्पर्धेसाठी तयारीला लागला आहे. मात्र, कोरोनामुळे ही स्पर्धा कधी होणार याची धास्ती जिल्ह्यातील मल्लांना लागली आहे.

खुराकासाठी महिन्याला २० हजार...

शिवछत्रपती पुरस्कार विजेता ज्ञानेश्वर गोचडे म्हणाला, एका मल्लाला महिन्यासाठी कुस्तीचा सराव व खुराकासाठी साधारण २० हजार रुपयांचा खर्च येतो. यात्रेतील मिळणाऱ्या बक्षीस रकमेतून गरीब पैलवान हा खर्च भागवितात. काही मल्ल तर यावरच विसंबून आहेत, मात्र स्पर्धा होत नसल्याने अडचण आहे. शासनाने पैलवानांना मानधन द्यावे.

स्पर्धा नसल्याने आर्थिक अडचण...

कोरोनाच्या महामारीमुळे कुस्ती स्पर्धेचा दुसरा सीझनही जात आहे. त्यामुळे आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. आयपीएलची स्पर्धा होते, मात्र कुस्तीचे आखाडे होत नाहीत. प्रेक्षकांशिवाय कुस्ती व्हावी, असे राष्ट्रीय कुस्तीपटू पंकज पवार यानी सांगितले.

मल्लांना आर्थिक मदत करावी...

कोरोनाच्या संकटामुळे कुस्तीचे आखाडे रद्द होत आहेत. त्यामुळे कुस्तीगीर अडचणीत आहेत. ग्रामस्थांनी आपल्या गावांतील मल्लांना आर्थिक आधार द्यावा. यासह जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती व कंपन्यांनी पुढाकार घेऊन जिल्ह्यातील गरजवंत मल्लांना आर्थिक हातभार द्यावा, असे कुस्ती प्रशिक्षक मुकरम बंडे म्हणाले.