शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर लातूर मनपाला जाग; अनधिकृत होर्डिंगवर जेसीबी

By हणमंत गायकवाड | Updated: May 17, 2024 13:02 IST

लातूर शहरांमध्ये ३६१ अनाधिकृत होर्डिंग आहेत. स्ट्रक्चरल ऑडिट झाले नाही की स्टॅबिलिटी प्रमाणपत्र नाही. अनेकांनी बिनधास्तपणे होर्डिंग लावलेले आहेत.

लातूर: शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिंग लावण्यात आले असून मुंबई येथील दुर्घटनेनंतर हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी महानगरपालिका आणि नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रात अनधिकृत होर्डिंग काढण्याचे आदेश दिल्यानंतर मनपाला जाग आली आहे. शहरात जेसीबीद्वारे होर्डिंग काढण्याच्या कारवाईला बुधवारी दुपारनंतर प्रारंभ करण्यात आला. सायंकाळी सहा वाजेपर्यंत आठ ते दहा अनधिकृत होर्डिंग करण्यात आले होते. दरम्यान, होर्डिंगमधून तीन एजन्सींकडून एप्रिल २०१९ ते मार्च २०२३ पर्यंत १९ लाख ५७ हजार ५०० रुपयांची वसुली करण्यात आली आहे.

लातूर शहरांमध्ये ३६१ अनाधिकृत होर्डिंग आहेत. स्ट्रक्चरल ऑडिट झाले नाही की स्टॅबिलिटी प्रमाणपत्र नाही. अनेकांनी बिनधास्तपणे होर्डिंग लावलेले आहेत. विशेष दोघा-तिघांचा अपवादवगळता अनेकांनी अधिकृत शुल्कही भरलेले नाही. याकडे मनपाचे दुर्लक्ष कसे राहिले, हा प्रश्न आहे. अनधिकृत होल्डिंग लावण्यास कोणाचे अभय आहे. या बाबीची चौकशी होण्याची गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने याबाबत निवेदन देण्यात आले असून अनधिकृत होर्डिंग राजरोसपणे कसे लावण्यात आले याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

अनाधिकृत होर्डिंग लावण्याला कोणाचे अभय? चौकशीची मागणीवादळी वारे आणि अवकाळी पाऊस शहरावर घोंगावत आहे. अशावेळी मान्सूनपूर्व कामे करणे अपेक्षित असते. मात्र, मान्सूनपूर्व कामे राहिले बाजूला. अनधिकृत कामाचा ताण मनपात आहे. चिरीमिरीमुळे अनधिकृत कामे वाढतात,असा आरोप राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या वतीने आयुक्तांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे. कोणाच्या सांगण्यावरून अनधिकृत होर्डिंग लावले? त्यावर मनपाने कारवाई का केली नाही? कारवाई करण्याकडे डोळेझाक का केली? त्याला कोण जबाबदार ? याची चौकशी करावी, अशी मागणी या निवेदनात राष्ट्रवादीने केली आहे.

मान्सूनपूर्व कामाकडे महानगरपालिकेचे नेहमीच दुर्लक्ष..दरवर्षी शहरातील प्रभाग क्र ३,४,५ आणि लातूर शहरातील पूर्वभाग व सखल भागात वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांच्या घरात आणि झोपडट्ट्यांमध्ये पावसाचे पाणी शिरते, रस्त्यांवर पाणी साचते, नाले तुंबतात. पावसाळ्यातील वादळी वाऱ्यांमुळे धोकादायक झाडे, फलक उन्मळून पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाणी तुंबणाऱ्या भागाची पाहणी करून पाण्याचा निचरा करणे. रस्त्यावर पाणी साचणार नाही याची दक्षता घेणे, चेंबर्स साफ करणे, आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी स्वतंत्र विभाग उभारण्याबाबत काही निर्णय घेणे. पावसाचे पाणी साचून घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन उद्भवणाऱ्या आरोग्य समस्यांवर काही उपाययोजना आखणे, मान्सूनपूर्व उपाययोजनांशी संबंधित सर्व कामे प्राधान्याने करणे या कामाकडे महानगरपालिका प्रशासनाचे सध्या तरी दुर्लक्ष दिसत आहे.

टॅग्स :laturलातूरMuncipal Corporationनगर पालिकाEnchroachmentअतिक्रमण