शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

तेरणा नदीवरील जीर्ण पुलाच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्षच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:23 IST

निलंगा : तालुक्यातील येळनूर येथील तेरणा नदीवरील पुलाची अवस्था अतिशय जीर्ण झाली असून, तो ढासळण्याची भीती निर्माण झाली आहे. ...

निलंगा : तालुक्यातील येळनूर येथील तेरणा नदीवरील पुलाची अवस्था अतिशय जीर्ण झाली असून, तो ढासळण्याची भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, सहा महिन्यांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित अधिकाऱ्यांनी पुलाची पाहणी केली होती. मात्र, अद्यापही दुरुस्तीसंदर्भात कुठलीही हालचाल झाली नाही. त्यामुळे गुंजरगा, येळणूर, चांदोरी, बोरसुरीच्या ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे.

तालुक्यातील येळनूर येथून वाहणाऱ्या तेरणा नदीवरून ये-जा करण्यासाठी १९७६ मध्ये शंभर मीटर लांबीचा दगडी पूल तयार करण्यात आला होता. त्यानंतर मात्र पुलाची कसलीही डागडुजी करण्यात आली नसल्याने हा पूल अतिशय जीर्ण झाला आहे. गावालगतच्या या पुलावरून सतत वाहतूक होत असते. उच्चस्तरीय बॅरेजेसलगत हा पूल असल्यामुळे पाण्याचा प्रवाहाचा नेहमीच पुलाला फटका बसतो. त्यामुळे हा पूल मजबूत होणे गरजेचे आहे.

यासंदर्भात गावच्या सरपंच सोनाबाई परमेश्वर सोळुंके यांनी जिल्हा परिषदेकडे डागडुजीची मागणी केली असता येथील शाखा अभियंता गंगथडे व कनिष्ठ अभियंता यू.जी. चव्हाण यांनी १७ जुलै २०२० रोजी पुलाची पाहणी करून सदरील पुलाची डागडुजी करणे आवश्यक असल्याचा अहवाल वरिष्ठांकडे सादर केला होता. तसेच ऑक्टोबर २०१९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक तथा औसा मतदारसंघाचे विद्यमान आ. अभिमन्यू पवार यांच्या पत्रान्वये सदरील पुलाची डागडुजी करण्यासाठी लातूर पाटबंधारे विभाग क्र. १ यांनी जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना पत्रान्वये सदरील डागडुजी करणे आवश्यक असल्याचे कळविले होते. या पुलाची दयनीय अवस्था झाली असून, स्लॅब कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. पुलाच्या खालच्या बाजूच्या सळया उघड्या पडल्या आहेत. पुलाच्या वर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे डागडुजी कधी होणार, असा सवाल येळनूरचे ग्रामस्थ अजित सोळुंके यांनी केला आहे.

संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुलाची काही वर्षांपूर्वी पाहणी केली. मात्र, त्यावर अद्याप कसलीच कार्यवाही झाली नाही. यासंदर्भात लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी एप्रिलमध्ये भेट देऊन तत्काळ नूतनीकरण करण्याचा शब्द गावकऱ्यांना दिला होता.

निधी उपलब्ध होताच डागडुजी...

जिल्हा परिषदेचे कार्यकारी उपअभियंता श्रीनिवास गंगथडे म्हणाले, सदरील पुलाची डागडुजी व नूतनीकरणासाठी १ कोटी १७ लाखांचा प्रस्ताव तयार करून अहवाल मंजुरीसाठी ग्रामविकास खाते व जिल्हा परिषद विभागाकडे मे महिन्यात पाठविला आहे. या विभागातून लवकरच मंजुरी मिळेल. निधी उपलब्ध होताच तत्काळ डागडुजी व नूतनीकरण करण्यात येईल.

सदरील पुलाची दुरवस्था झाली आहे. लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी चांदोरीचे सरपंच विजय सोळुंके यांनी केली आहे.