जिल्ह्यात ९५८ रुग्णांची भर; १४४६ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:18 IST2021-05-01T04:18:26+5:302021-05-01T04:18:26+5:30

१४४६ रुग्णांची कोरोनावर मात... शुक्रवारी प्रकृती ठणठणीत झाल्याने १ हजार ४४६ जणांना सुटी देण्यात आली. त्यात होमआयसोलेशनमधील १ हजार ...

Addition of 958 patients in the district; 1446 Corona free | जिल्ह्यात ९५८ रुग्णांची भर; १४४६ कोरोनामुक्त

जिल्ह्यात ९५८ रुग्णांची भर; १४४६ कोरोनामुक्त

१४४६ रुग्णांची कोरोनावर मात...

शुक्रवारी प्रकृती ठणठणीत झाल्याने १ हजार ४४६ जणांना सुटी देण्यात आली. त्यात होमआयसोलेशनमधील १ हजार ७८, सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल गांधी चौक येथील २१, ग्रामीण रुग्णालय औसा येथील ४, अहमदपूर १, चाकूर १, मुरुड १, एक हजार मुला-मुलींच्या वसतीगृहातील १४५, तोंडार पाटी कोविड केअर सेंटरमधील ८, जयहिंद सैनिक शाळा कोविड केअर सेंटर उदगीर येथील ६, मरशिवणी कोविड केअर सेंटरमधील ३, मुलांची शासकीय शाळा औसा ५, दापका कोविड सेंटर ८, देवणी कोविड केअर सेंटरमधील ३, कृषि पीजी कॉलेज येथील १६, बावची कोविड केअर सेंटर ९, पुरणमल लाहोटी तंत्रनिकतन वसतीगृह ४३, जळकोट कोविड सेंटर ३, समाजकल्याण वसतीगृह कव्हा रोड येथील २८ अशा एकूण १४४६ जणांना प्रकृती बरी झाल्याने सुटी देण्यात आली.

Web Title: Addition of 958 patients in the district; 1446 Corona free