जिल्ह्यात ४१ नव्या बाधित रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:32 IST2020-12-05T04:32:23+5:302020-12-05T04:32:23+5:30

३१ जणांनी केली कोरोनावर मात... शुक्रवारी जिल्ह्यातील ३१ रुग्णांची प्रकृती ठणठणीत बरी झाल्याने रुग्णालय प्रशासनाच्या वतीने सुटी देण्यात आली. ...

Addition of 41 new infected patients in the district | जिल्ह्यात ४१ नव्या बाधित रुग्णांची भर

जिल्ह्यात ४१ नव्या बाधित रुग्णांची भर

३१ जणांनी केली कोरोनावर मात...

शुक्रवारी जिल्ह्यातील ३१ रुग्णांची प्रकृती ठणठणीत बरी झाल्याने रुग्णालय प्रशासनाच्या वतीने सुटी देण्यात आली. यामध्ये विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील ३, एक हजार मुलांचे वसतीगृह १२ नंबर पाटी येथील ७ तर होम आयसोलेशनमधील ११ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४६ हजार ७३६ जणांच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ७ हजार ६४९ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तर ९० हजार ४८४ जणांची रॅपिड ॲन्टीजन टेस्ट करण्यात आली आहे. त्यापैकी १४ हजार ३६१ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. आरोग्य विभागाच्या वतीने कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी स्वॅब आणि रॅपिड ॲन्टीजन चाचण्यांवर अधिक भर दिला जात असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

Web Title: Addition of 41 new infected patients in the district