शहरं
Join us  
Trending Stories
1
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
2
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
3
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
4
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
5
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
6
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
7
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
8
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
9
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
10
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
11
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
12
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
13
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
14
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
15
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
16
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
17
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
18
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
19
Marathi News LIVE : इराणच्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय जखमी, भारताने व्यक्त केला संताप 
20
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
Daily Top 2Weekly Top 5

गंजगोलाईत हातगाडा विक्रेत्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:24 IST

कोरोनामुक्तीसाठी ग्रामपंचायतींचा पुढाकार लातूर : जिल्ह्यात ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असताना अनेक ग्रामपंचायतींनी कोरोनामुक्तीसाठी पुढाकार घेतला ...

कोरोनामुक्तीसाठी ग्रामपंचायतींचा पुढाकार

लातूर : जिल्ह्यात ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असताना अनेक ग्रामपंचायतींनी कोरोनामुक्तीसाठी पुढाकार घेतला आहे. गावात येणाऱ्या नागरिकांची चौकशी केली जात असून, विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. तसेच गावातील तरुणांच्या वतीने लसीकरणाबाबत जनजागृती केली जात आहे. दरम्यान, ग्रामीण भागात कोरोनामुक्तीसाठी ग्रामपंचायती पुढाकार घेत असल्याचे चित्र आहे.

समुपदेशन करणारी समिती कागदोपत्रीच

लातूर : कोरोना बाधित रुग्णांचे समुपदेशन करण्यासाठी समुपदेशन समिती स्थापन करण्याचे निर्देश असले तरी ही समिती केवळ कागदाेपत्रीच असल्याचे चित्र आहे. अनेक कोरोना बाधित रुग्णांना मानसिक आजाराची गरज असते. त्यासाठी समुपदेशन समिती गठन करण्याचे तालुकास्तरावर आदेश आहेत. मात्र प्रत्यक्षात ही समिती नावालाच आहे. याकडे संबंधित आरोग्य विभाग तसेच तालुका प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

लसीकरणासाठी सामाजिक संस्थांची जनजागृती

लातूर : विविध सामाजिक संस्थांच्या वतीने लसीकरणासाठी जनजागृती मोहीम राबविली जात आहे. ऑनलाईन पद्धतीने नोंदणी कशी करावी, लस घेतल्यानंतर काय काळजी घ्यावी, जवळील लसीकरण केंद्र आदींबाबत जनजागृती केली जात आहे. नागरिकांनी लस घेतल्यानंतर ही योग्य ती काळजी घ्यावी, मास्क, सॅनिटायझर, फिजिकल डिस्टन्सचा अवलंब करावा, असे आवाहन ही सामाजिक संस्थांच्या वतीने करण्यात येत आहे. दरम्यान, यामध्ये विविध महाविद्यालयातील रासेयो स्वयंसेवकांचा सहभाग आहे.

कोविड केअर सेंटरला मदतीचा हात

लातूर : लातूर शहरासह जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मदत करता यावी, या उद्देशाने विश्वनाथ आल्टे यांनी कोविड केअर सेंटरमधील रुग्णांसाठी सलाईन स्टँड मदत म्हणून दिले आहे. यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांच्या उपस्थितीत सलाईन स्टँड मनपा आरोग्य विभागाकडे सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी महेश सिरसाठ, तेली, नगरसेवक युनुस मोमीन, सचिन बंडापल्ले, शंकर जाधव, आनंद सोनवणे, अमोल कदम आदींची उपस्थिती होती.

युवकांच्या पुढाकारातून गरजूंना भोजन

लातूर : शहरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना युवकांच्या पुढाकारातून मोफत भोजन दिले जात आहे. सकाळ आणि सायंकाळच्या सत्रात मोफत भोजन दिले जात असून, आगामी काळात हा उपक्रम इतर कोविड केअर सेंटर परिसरात राबविण्यात येणार आहे. यशस्वितेसाठी अनिल कोतवाड, योगेश सारसेकर, अक्षय गवळी, अय्याज शेख, कुलभूषण घोडके, विकी गायकवाड, शिवा वेदपाठक, महादू रासे आदी परिश्रम घेत आहेत.