शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
2
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
4
IPL 2026: वैभव-यशस्वीची धडाकेबाज जोडी फ्लॉप! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला मोठा दिलासा
5
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
6
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
7
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
8
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
9
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
10
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
11
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
12
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
13
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
14
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
15
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
16
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
17
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
18
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
19
सहलीत सेल्फीचा मोह जिवावर बेतला, मावळच्या धरणात तीन मित्र बुडाले; एकाला वाचविण्यात यश
20
...तेव्हाच मुंबई, गोवा ड्रग्जमुक्त होऊ शकेल; इथे दबा धरून बसलेत हजारो सलीम डोला
Daily Top 2Weekly Top 5

७ हजार ९६१ जणांनी घेतली काेविड लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:14 IST

जळकोट तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढला होता. तो रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत, तसेच कोविड रुग्णांना तात्काळ उपचार ...

जळकोट तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढला होता. तो रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत, तसेच कोविड रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत म्हणून प्रयत्न करण्यात येत आहेत. तालुक्यात कोविड लसीकरणाचे प्रमाण वाढावे म्हणून महसूल, पंचायत समिती, पोलीस प्रशासनाच्या वतीने वारंवार जनजागृती करण्यात आली, तसेच आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जगदीश सूर्यवंशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पवार यांनीही जनजागृती करून आवाहन केले होते.

जळकोटसह तालुक्यातील वांजरवाडा, अतनूर या तिन्ही ठिकाणी कोविड लसीकरण वाढावे म्हणून तहसीलदार संदीप कुलकर्णी, गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे, नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी उज्ज्वला शिंदे, डॉ. जगदीश सूर्यवंशी, डॉ. संजय पवार यांनी शहर, गावांत फिरून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली होती. दरम्यान, संसर्ग रोखण्यासाठी कोविड चाचण्या वाढविण्याच्या सूचना अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांनी वेळोवेळी बैठका घेऊन केल्या होत्या. त्यामुळे लसीकरणाचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.

१ हजार ४६ जणांनी घेतले दोन्ही डोस...

तालुक्यातील ६ हजार ९१५ जणांनी कोविडचा पहिला डोस घेतला आहे, तसेच १ हजार ४६ जणांनी कोविडचा दुसरा डोस घेतला आहे. या सर्वांना कुठलाही त्रास जाणवला नाही. त्यामुळे लसीकरणास पात्र असलेल्या सर्वांनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. त्यासाठी ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन डॉ. जगदीश सूर्यवंशी यांनी केले आहे.

सध्या जळकोट तालुक्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. काही बाधित गृहविलगीकरणात आहेत. ते आरोग्य विभागाने लागू केलेल्या नियमांचे पालन करीत आहेत. संसर्ग वाढू नये म्हणून प्रशासनाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. सर्वांनी शासन नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.