कपाटातील ५ तोळ्याचे सोने चोरले, आरोपीस पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:14 IST2021-07-05T04:14:21+5:302021-07-05T04:14:21+5:30

उदगीर ग्रामीण पोलिसांनी सांगितले, फिर्यादी तुकाराम सुरकुटे (रा. शाहुनगर, देगलूर रोड, उदगीर) हे घराला कुलूप लावून मुलाला भेटण्यासाठी अमेरिकेला ...

5 ounces of gold stolen from cupboard, accused in police custody | कपाटातील ५ तोळ्याचे सोने चोरले, आरोपीस पोलीस कोठडी

कपाटातील ५ तोळ्याचे सोने चोरले, आरोपीस पोलीस कोठडी

उदगीर ग्रामीण पोलिसांनी सांगितले, फिर्यादी तुकाराम सुरकुटे (रा. शाहुनगर, देगलूर रोड, उदगीर) हे घराला कुलूप लावून मुलाला भेटण्यासाठी अमेरिकेला गेले होते. २६ जून २०२० ते १६ जानेवारी २०२१ च्या दरम्यान आरोपी लक्ष्मीकांत किशोर पाटील (रा. कौळखेड, ता. उदगीर, हमु. विकास नगर) याने फिर्यादीच्या घराचे बनावट चावीने कुलूप उघडून आतमध्ये प्रवेश केला. घरातील कपाटाचे लॉक तोडून कपाटातील भाडे चिठ्ठीवर फिर्यादीच्या संमतीशिवाय फिर्यादीची सही, नाव व मोबाईल क्रमांक टाकून बनावट भाडे चिठ्ठी तयार केली. तसेच कपाटातील पाच तोळ्याचे सोन्याचे बिस्कीट अंदाजे किंमत २ लाख २५ हजार पळविले. याप्रकरणी शनिवारी रात्री उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीस अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने आरोपीस चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याचे तपास अधिकारी सपोनि. नौशाद पठाण यांनी सांगितले.

Web Title: 5 ounces of gold stolen from cupboard, accused in police custody