विजेच्या जबर धक्क्याने १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू!

By राजकुमार जोंधळे | Updated: May 7, 2026 00:19 IST2026-05-07T00:19:21+5:302026-05-07T00:19:58+5:30

किनगाव येथील घटना : घराच्या पत्र्यात उतरला वीजप्रवाह

18 year old youth dies due to electric shock | विजेच्या जबर धक्क्याने १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू!

विजेच्या जबर धक्क्याने १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू!

राजकुमार जाेंधळे, लातूर : सर्व्हिस वायरच्या तुटलेल्या प्रवाहाने एका हसत्याखेळत्या कुटुंबाचा आधार हिरावला गेला आहे. अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे मंगळवारी मध्यरात्री विजेचा धक्का बसल्याने १८ वर्षीय ओम ईश्वर हुडगे या तरुणाचा मृत्यू झाला. याच घटनेत त्याचा मोठा भाऊ थोडक्यात बचावला आहे.

ओम हुडगे हा तरुण आपल्या भावासोबत घराच्या दुसऱ्या मजल्यावर झोपला होता. दरम्यान, मंगळवारी मध्यरात्री साधारण एक वाजण्याच्या सुमारास तो लघुशंकेसाठी खाली येत होता. यावेळी पावसाने अथवा इतर तांत्रिक कारणाने घरावरून गेलेली सर्व्हिस वायर कट होऊन तिचा विद्युत प्रवाह घराच्या पत्र्यांत उतरला. अंधारात ओमचा हात या पत्र्यांना लागला आणि त्याला विजेचा जबर धक्का बसला. यावेळी ओम हा जागीच कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला.

अन् माेठा भाऊ थाेडक्यात बचावला...

अर्ध्या तासानंतर ओमचा मोठा भाऊ खाली आला. त्याला ओम निपचित पडलेला दिसला. काहीतरी अघटित घडल्याच्या भीतीने त्याने ओमला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यालाही विजेचा जोरदार धक्का बसला. त्याने स्वतःला सावरत जोरात आरडाओरडा केला. यामुळे घरातील इतर सदस्य जागे झाले आणि ताे बचावला.

उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवली...

कुटुंबीयांनी तातडीने ओमला किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्याला अहमदपूरला हलवण्याचा सल्ला दिला. अहमदपूर ग्रामीण रुग्णालयात पोहोचल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला ‘मृत’ घोषित केले.

ओमचे शिक्षण झाले बारावीपर्यंत...

मृत ओमचे शिक्षण मल्हारराव होळकर आश्रमशाळेतून इयत्ता बारावीपर्यंत झाले आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पश्चात आई, वडील आणि दोन भाऊ असा परिवार आहे.

Web Title : लातूर जिले में बिजली के झटके से 18 वर्षीय युवक की मौत

Web Summary : अहमदपुर के किंगांव में एक 18 वर्षीय युवक की घर की टिन की छत पर बिजली के तार को छूने से करंट लगने से मौत हो गई। उसका भाई भी झटके से बच गया। ओम हुडगे को अस्पताल में मृत घोषित कर दिया गया। उसने 12वीं कक्षा पूरी की थी।

Web Title : 18-Year-Old Dies of Electrocution in Latur District

Web Summary : An 18-year-old in Kingaon, Ahmedpur, died from electrocution after touching a live wire on his house's tin roof. His brother was also shocked but survived. Om Hudge was declared dead at the hospital. He had completed his 12th grade.