किनगाव येथील रक्तदान शिबिरात १०८ जणांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:24 IST2021-09-17T04:24:55+5:302021-09-17T04:24:55+5:30

शिबिरास माजी सरपंच सुभाष मुंडे, सहायक पोलीस निरीक्षक शैलेश बंकवाड, रिपाइं जिल्हा उपाध्यक्ष सुनील वाहुळे, रफिक शेख, धम्मानंद कांबळे, ...

108 people participated in the blood donation camp at Kingaon | किनगाव येथील रक्तदान शिबिरात १०८ जणांचा सहभाग

किनगाव येथील रक्तदान शिबिरात १०८ जणांचा सहभाग

शिबिरास माजी सरपंच सुभाष मुंडे, सहायक पोलीस निरीक्षक शैलेश बंकवाड, रिपाइं जिल्हा उपाध्यक्ष सुनील वाहुळे, रफिक शेख, धम्मानंद कांबळे, दशरथ कांबळे, धनराज गिरी, जमादार व्यंकट महाके यांची उपस्थिती होती. जय शिवा गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. रक्ताचा तुटवडा लक्षात घेतात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच शनिवारी १०० वृक्ष गार्डसह बसविण्यात येणार आहेत.

यशस्वीतेसाठी राजकुमार बोडके, धनराज बोडके, सुमित शेळके, अमोल बावगे, बसवराज हुडगे, बंडू शृंगारे, तुषार शृंगारे, मंगेश कांबळे, अंकुश यरमुळे, अश्विन नागराळे, दिनेश किनकर, मोसिन शेख, रतन सौदागर, महेश चाकाटे, अतुल भदाडे आदींनी परिश्रम घेतले. रक्त संकलन भालचंद्र ब्लड बँकचे जनसंपर्क अधिकारी किशोर पवार, महेंद्र गांधले, मुजीब सौदागर, संतोष पाटील, रेखा गवळी, अरुण कासले, बालाजी वेदपाठक, नितीन क्षीरसागर, अन्सार शेख यांनी केले.

Web Title: 108 people participated in the blood donation camp at Kingaon