शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

युथ सोशल ग्रुपची ‘दशकपूर्ती’ उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:18 IST

कोल्हापूर : येथील युथ सोशल पाॅवर ग्रुपच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात कोरोना ...

कोल्हापूर : येथील युथ सोशल पाॅवर ग्रुपच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात कोरोना योध्द्यांचा सत्कार मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.

या ग्रुपच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त सकाळी आठ वाजता महापालिका उपायुक्त निखिल मोरे यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी पूल परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले, तर दुपारी लक्ष्मीपुरी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मार्केटच्या बोर्डची रंगरंगोटी करून त्याचे उद्‌घाटन आमदार चंद्रकांत जाधव यांच्याहस्ते करण्यात आले. पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड, अनिल गुजर, संदीप कोळेकर, संतोष घोळवे, शहर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी, उद्योजक निरंजन शेटे यांच्याहस्ते कोरोना योध्द्यांना समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

फोटो : ०९०७२०२१-कोल-करवीर

ओळी :

येथील युथ सोशल पाॅवर ग्रुपच्या दहाव्या वर्धापनदिनी शुक्रवारी कोरोना काळात सामाजिक काम करणाऱ्या पत्रकार व महापालिका कर्मचाऱ्यांचा करवीरचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्याहस्ते समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.