शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात कोल्हापूरचा तरुण ठार, चौघे जखमी

By admin | Updated: July 3, 2016 00:57 IST

काळाचा घाला : वर्षा पर्यटनासाठी आंबोलीला जात होते

आजरा : कोल्हापूर येथून आंबोलीकडे जाणाऱ्या कारची बेकरीमाल वाहतूक करणाऱ्या टेम्पोला जोरदार धडक बसून कारमधील संदीप रघुनाथ कागले (वय ३१, रा. शनिवार पेठ, कोल्हापूर) हे जागीच ठार झाले. तर विशाल विजय शिंदे (रा. कॉमर्स कॉलेजमागे, कोल्हापूर), विशाल डिगे (रिलायन्स मॉल शेजारी, कोल्हापूर), सागर पंडित जिनकर (रा. कणेरीनगर, कोल्हापूर), व अभिजित राऊत (शिवाजी पेठ, कोल्हापूर) हे चौघेजण जखमी झाले. दुपारी साडेतीन वाजता हा अपघात झाला. याबाबत घटनास्थळ व आजरा पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, संदीप कागले यांच्यासह पाचजण कोल्हापूरहून आंबोली येथे वर्षा पर्यटनासाठी कारने चालले होते. आजऱ्यापासून सहा किलोमीटर अंतरावर खेडे गावनजीक त्यांच्या कारची वळणावर थेट नांदणीकडे चाललेल्या टेम्पोला जोरदार धडक बसली. यामध्ये कारचा पुढचा भाग पूर्णपणे सरकून मागे आला. त्यामध्ये संदीप हे जागीच ठार झाले, तर अन्य चारजण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी गडहिंग्लज येथील खासगी दवाखान्यात हलविण्यात आले. मृत कागले हे औषध विक्री प्रतिनिधी म्हणून काम करीत होते. आठवड्यापूर्वी आपल्या कुं टुंबीयांसह याच मार्गे आंबोली येथे पर्यटनासोबत जाऊन आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, आई-वडील व अडीच वर्षांचा मुलगा आहे. शनिवार पेठेत सन्नाटा संदीप कागले हे मार्केटिंगचा व्यवसाय करीत होते. त्यांच्या अपघाती निधनाची माहिती समजताच आमदार राजेश क्षीरसागर यांनी काही कार्यकर्त्यांना आजऱ्याकडे पाठविले. संदीप यांच्या मृत्यूची बातमी कुटुंबीयांना सांगितली नव्हती. नातेवाईक आजूबाजूला येऊन थांबले होते. रात्री उशिरा त्यांचा मृतदेह शनिवार पेठेतील घरी आणल्यानंतर नातेवाइकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. संदीपचा स्वभाव मनमिळावू व बोलका होता.त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, भावजय, पत्नी, मुलगा असा परिवार आहे.