Navale Bridge Accident: पुणे येथील नवले ब्रिजजवळ अपघातात जयसिंगपुरातील तरुण ठार, धनंजयच्या मृत्यूने हळहळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 13:57 IST2025-11-14T13:56:32+5:302025-11-14T13:57:22+5:30
पुण्यात नाटक कलेबरोबर करीत होता व्यवसाय

Navale Bridge Accident: पुणे येथील नवले ब्रिजजवळ अपघातात जयसिंगपुरातील तरुण ठार, धनंजयच्या मृत्यूने हळहळ
जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) : पुणे येथील नवले ब्रिजजवळ अपघातात ठार झालेला मराठी नाटक कलाकार धनंजय कुमार कोळी (वय २५, रा. पहिली गल्ली, दत्त मंदिरापाठीमागे, जयसिंगपूर) याच्या मृत्यूच्या घटनेने जयसिंगपूर येथे शोककळा पसरली आहे. कोळी यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, असा परिवार आहे.
धनंजयचे नाटक क्षेत्रात अत्यंत प्रभावीपणे काम होते. तो पुण्यात नाटक कलेबरोबर आपला व्यवसाय करीत होता. अपघाताच्या घटनेनंतर नातेवाइकांनी पुण्याकडे धाव घेतली.
दोन कंटेनर आणि एका कारच्या झालेल्या जबरदस्त अपघातात काही क्षणांतच ७ जण जळून खाक झाले, तर तब्बल २० ते २२ जण जखमी झाले. गुरुवारी (दि. १३) सायंकाळच्या सुमारास कात्रज बोगद्याकडून नवले पुलाकडे येणाऱ्या महामार्गावर हा अपघात झाला. या अपघातात मृत्यू झालेल्या ७ जणांमध्ये एक ५ वर्षांची चिमुकलीही आहे.