पेठवडगाव येथे तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:28 IST2021-03-09T04:28:19+5:302021-03-09T04:28:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : येथील पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथील मार्केट यार्डमध्ये विषारी द्रव्य सेवन केल्याने बेशुध्दावस्थेत आढळलेल्या तरुणाचा ...

Young man dies at Pethwadgaon | पेठवडगाव येथे तरुणाचा मृत्यू

पेठवडगाव येथे तरुणाचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : येथील पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथील मार्केट यार्डमध्ये विषारी द्रव्य सेवन केल्याने बेशुध्दावस्थेत आढळलेल्या तरुणाचा सोमवारी दुपारी सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. राजेश विलास कोळेकर (वय ३५, रा. इंदिरा हौसिंग कॉलनी, पेठवडगाव) असे त्या मृताचे नाव आहे. त्याला रविवारी उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले होते. याची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे.

विष प्राशनाने युवकाचा मृत्यू

कोल्हापूर : विषारी द्रव्य प्राशन केलेल्या तरुणाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. निनाद सचिन रेवडेकर (वय २२, रा. बिंदू चौक) असे मृताचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी त्याने घरातच विषारी द्रव्य घेतले, त्याला रात्रीच तातडीने बेशुध्दावस्थेत उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले होते, उपचार सुरू असताना सोमवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला.

Web Title: Young man dies at Pethwadgaon