खोचीतील भैरवनाथ देवाची यात्रा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:25 IST2021-04-21T04:25:28+5:302021-04-21T04:25:28+5:30

कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच गावांतील यात्रा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या आदेशानुसार रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ...

Yatra of Bhairavnath Deva in Khochi canceled | खोचीतील भैरवनाथ देवाची यात्रा रद्द

खोचीतील भैरवनाथ देवाची यात्रा रद्द

कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच गावांतील यात्रा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या आदेशानुसार रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे खोची येथील भैरवनाथ यात्रा रद्द करण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर येथील रविवारी (दि.२५) रात्री बारा वाजता होणारा पालखी सोहळा, सासनकाठी मिरवणूक व सोमवारी (दि.२६) पहाटे होणारा विवाह सोहळा रद्द करण्यात आला आहे.

तसेच रविवारी (दि.२ मे) होणारी गावयात्रा व मंगळवारी (दि. ११ मे) होणारा दुपारी बाराचा पाकाळणी पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. यादिवशी पोलीस बंदोबस्त असल्याने भाविकांनी याची दखल घेत मंदिरात दर्शनासाठी व परिसरात येऊ नये, असे सांगण्यात आले आहे.

Web Title: Yatra of Bhairavnath Deva in Khochi canceled