शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
2
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
3
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
4
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
5
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
6
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
7
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
9
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
10
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
11
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
12
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
13
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
14
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
15
‘तुम्ही घुसखोर आहात का? हे सिद्ध करण्याची वेळ आणू नका’ म्हाडाच्या उपाध्यक्षांची नागरिकांना दमदाटी
16
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
17
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
18
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
19
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
20
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातही मराठा समाजाचा यल्गार

By admin | Updated: September 6, 2016 01:32 IST

पुढील महिन्यात मोर्चा : नियोजनासाठी उद्या शेकापच्या कार्यालयात बैठक

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांत बीड, परभणी, नाशिक या ठिकाणी लाखोंच्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर उतरला. यावेळी कोणती घोषणा नाही की कुठला पक्ष अथवा संघटनेचे स्कार्फ नाहीत, फक्त हातात भगवे ध्वज घेऊन या समाजाने आपल्या भावना मूकपणे मांडून सत्ताधाऱ्यांसह विरोधकांच्याही पोटात गोळा आणला. त्याच धर्तीवर कोल्हापुरात मोर्चा केव्हा निघणार याबाबत समाजबांधवांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. मराठा समाजातील उच्चविद्याविभूषित तरुणांसह संघटनांनी यासाठी पुढाकार घेतला असून पुढील महिन्यात हा मोर्चा निघणार आहे. कोपर्डी घटना, अ‍ॅट्रासिटीचा गैरवापर, मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशा मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. बीड, परभणी, नाशिक या ठिकाणी लाखोंच्या संख्येने मूकमोर्चे निघत आहे. शांततेच्या मार्गाने व संयमाने मराठा समाजाने आपल्या मागण्या लोकशाही पद्धतीने मांडल्या आहेत. कुठल्याही जाती-धर्माविरोधात नसणाऱ्या या मोर्चामुळे सत्तारूढ व विरोधकही धास्तावले आहेत. अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याची दखल घेऊन या शांतताप्रिय मोर्चाचे कौतुक केले आहे. मराठा समाज संघटित होत आहे. आपल्या मागण्यांसाठी वेगळ्या पद्धतीने तो रस्त्यावर उतरत आहे. मूळच्या आक्रमक स्वभावाला संयमाची जोड देऊन या समाजाने वेगळा संदेश तमाम महाराष्ट्राला दिला आहे. (प्रतिनिधी)राज्यात इतर ठिकाणी लाखोंच्या संख्येने निघालेल्या मराठा समाजाच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात केव्हा मोर्चा निघणार? याबाबत लोकांमध्ये उत्सुकता आहे. समाजबांधवांकडून याबाबत विचारणा होत आहे. त्यामुळे मराठा समाज संघटनांची बैठक घेण्यात येऊन मोर्चाची तारीख निश्चित केली जाणार आहे. हा मोर्चा कुठल्या जाती-धर्माविरोधात असणार नाही.- वसंतराव मुळीक, जिल्हाध्यक्ष, मराठा महासंघराज्यात इतर ठिकाणी मोेर्चे काढून मराठा समाज आपल्या भावना मूकपणे मांडत आहे. त्या धर्तीवर कोल्हापुरातही अशा स्वरुपाचा मोर्चा निघावा, अशी कल्पना समोर आली. त्यासाठी समाजबांधवांमध्ये जागृती होऊन ते एकत्र यावेत, यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून संदेश पाठविले आहेत.-अजित पाटील, युनायटेड मराठा आॅर्गनायझेशनसोशल मीडियाच्या माध्यमातून हाक या मोर्चांच्या धर्तीवर कोल्हापुरात केव्हा मोर्चा निघणार? याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. कोल्हापुरातील एका कंपनीत नेटवर्क इंजिनिअर म्हणून नोकरीस असलेल्या अजित पाटील (रा.अतिग्रे, ता. हातकणंगले) यांनी कोल्हापुरातही मोर्चा काढण्यासंदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून मराठा समाजबांधवांना हाक दिली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मराठा समाजातील विविध मान्यवर व संघटनांची एकत्रित बैठक उद्या, बुधवारी दुपारी तीन वाजता टेंबे रोडवरील शेकापक्षाच्या कार्यालयात होत आहे. यामध्ये मराठा महासंघ, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, छावा संघटना, स्वाभिमान संघटना, क्षत्रिय मराठा चेंबर आॅफ कॉमर्स आदी विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.