दहावीची पुरवणी परीक्षा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:27 IST2021-09-23T04:27:58+5:302021-09-23T04:27:58+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर विभागातील इयत्ता दहावीच्या एकूण ८३७ विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने बुधवारपासून सुरू झाली. पहिल्यादिवशी मराठी ...

X supplementary examination begins | दहावीची पुरवणी परीक्षा सुरू

दहावीची पुरवणी परीक्षा सुरू

कोल्हापूर : कोल्हापूर विभागातील इयत्ता दहावीच्या एकूण ८३७ विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने बुधवारपासून सुरू झाली. पहिल्यादिवशी मराठी विषयाचा पेपर झाला. कोरोनाच्या नियमांचे पालन करत राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागाकडून परीक्षा घेण्यात येत आहे. या पुरवणी परीक्षेसाठी विभागातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत ३४ केंद्रे आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून परीक्षेसाठी एका वर्गामध्ये दहा ते बारा परीक्षार्थींची बैठक व्यवस्था केली आहे. सकाळच्या सत्रात साडेदहा वाजता मराठी विषयाचा पेपर झाला. त्यासाठी थर्मल गनने तपासणी करून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला. या विद्यार्थ्यांमध्ये पुनर्परीक्षार्थी, श्रेणी सुधारण्यासाठी परीक्षा देणारे परीक्षार्थी आदींचा समावेश आहे. सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर या परीक्षेसाठी बंधनकारक करण्यात आला आहे. या परीक्षेतील अखेरचा पेपर दि. ११ ऑक्टोबर रोजी होणार असल्याचे शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव देविदास कुलाळ यांनी बुधवारी सांगितले.

Web Title: X supplementary examination begins