राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी कोल्हापुरातील १० चित्रकारांच्या कलाकृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:24 IST2021-03-18T04:24:14+5:302021-03-18T04:24:14+5:30

कोल्हापूर : चित्र-शिल्प कलाक्षेत्रासाठी प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या बॉम्बे आर्ट सोसायटीच्या अखिल भारतीय वार्षिक चित्रप्रदर्शनात कोल्हापुरातील दहा चित्रकारांच्या कलाकृतींची निवड ...

Works of 10 painters from Kolhapur for state level exhibition | राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी कोल्हापुरातील १० चित्रकारांच्या कलाकृती

राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी कोल्हापुरातील १० चित्रकारांच्या कलाकृती

कोल्हापूर : चित्र-शिल्प कलाक्षेत्रासाठी प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या बॉम्बे आर्ट सोसायटीच्या अखिल भारतीय वार्षिक चित्रप्रदर्शनात कोल्हापुरातील दहा चित्रकारांच्या कलाकृतींची निवड झाली आहे. यात नऊ जण व्यावसायिक कलाकार व एका विद्यार्थी चित्रकाराच्या कलाकृतीचा समावेश आहे.

बाॅम्बे आर्ट सोसायटीतर्फे दरवर्षी राज्यभरातील चित्रकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन भरवले जाते. मुंबईतील जहाँगीर आर्ट गॅलरी येथे प्रत्येक वर्षी प्रदर्शन होते. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोसायटीने अद्यापही प्रदर्शनाची तारीख व ठिकाण जाहीर केलेले नाही. मात्र, कलाकारांची नावे जाहीर झाली आहेत. यंदाच्या स्पर्धेसाठी साडेतीन हजारांहून अधिक प्रवेशिका आल्या होत्या. त्यातून अंतिम चित्रकार व त्यांच्या कलाकृतींची निवड झाली आहे. यात कोल्हापुरातील चित्रकार आरिफ तांबोळी, अमोल सावंत, अनुप संकपाळ, जावेद मुल्ला, मंगेश शिंदे, रिचा वोरा, शुभम सुतार, विजय टिपुगडे, विजय उपाध्ये यांची व्यावसायिक विभागातून, तर विद्यार्थी विभागातून कैलास कुंभार यांच्या कलाकृतीची निवड झाली आहे.

--

Web Title: Works of 10 painters from Kolhapur for state level exhibition