शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘गोकुळ’च्या शिरोळ सॅटेलाईट डेअरीचे काम प्रगतिपथावर

By admin | Updated: November 14, 2014 00:44 IST

पन्नास टक्के पूर्ण : शासानाचा मंजूर निधी लवकरच मिळणार

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघा (गोकुळ) च्या शिरोळ येथील ‘सॅटेलाईट डेअरी’चे काम प्रगतीपथावर आले आहे. जुलैपर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. यासाठी शासनाकडून मंजूर झालेला निधीही लवकरच मिळणार आहे.राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत ‘गोकुळ’ दुध संघाच्या शिरोळ येथील अद्ययावत दुध प्रक्रिया प्रकल्प (सॅटेलाईट डेअरी) व गोकुळ शिरगाव येथील दुग्ध शाळेचे आधुनिकीकरण व बळकटीकरण करणे, ‘ईटीपी’ प्लांट उभारणे या दोन्ही प्रकल्पांसाठी शासनाकडून मिळणारा निधी जुलै महिन्यातच मंजूर झाला आहे.शिरोळच्या प्रकल्पाची किंमत २४ कोटी ६६ लाख ९० हजार २०५ रुपये व शिरगाव येथील प्रकल्पाची किंमत २४ कोटी ९० लाख रुपये आहे. या प्रकल्पांसाठी पन्नास टक्के रक्कम दूध संघाची व उरलेली रक्कम शासनाकडून निधीच्या माध्यमातून असे सुत्र आहे. यावर्षीच्या सुरुवातीलाच या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली आहे. दुध संघाने आपल्या खर्चातून युध्दपातळीवर काम करुन प्रकल्पाच्या कामाला प्रगतीपथाकडे नेले आहे. यापैकी शिरोळ येथील प्रकल्पाचे काम ५० टक्के तर शिरगाव येथील प्रकल्पाचे काम ३० टक्के झाले आहे. शासनाकडून मिळणारा निधी जुलै महिन्यात मंजूर झाला. परंतु रक्कम अद्याप दुध संघाला प्राप्त झाली नाही. लवकरच टप्प्याटप्प्याने मिळण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)