शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

महिलांना लुटणाऱ्या टोळीस अटक

By admin | Updated: August 23, 2014 00:07 IST

आंतरराज्य टोळी : महिलेसह सहाजण गजाआड; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर : राज्य महामार्गावर प्रवासी महिलांना गाडीत घेऊन लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीस कोल्हापुरातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. या टोळीकडून ४५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली दोन चारचाकी वाहने असा सुमारे २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक केलेले संशयित बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांतील असून, या टोळीतील अन्य तिघांचा शोध सुरू आहे.तुकाराम ऊर्फ नाना बाबू मुंडे (वय २९, रा. भोगलवाडी, ता. धारूर, जि. बीड), आक्का तुकाराम मुंडे (३७ ), राम भैरी इटकर (२१, रा. सोनारी, ता. परांडा, जि. उस्मानाबाद), गोकुळ तुकाराम इटकर, साधू आत्माराज ढिगारे (दोघे रा. सोनारी), ईश्वर चंद्रकांत दुबळे (२५, रा. सोनारी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने सोमवार (दि. २५) पर्यंत पोलीस कोठडी दिली असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक अंकित /गोयल यांनी आज, शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. या टोळीतील एका महिलेसह तिघांचा शोध सुरू असल्याचे गोयल यांनी सांगितले.गोयल म्हणाले, काही दिवसांपूर्वी अंबप फाट्यावर एका प्रवासी महिलेस त्यांनी आपल्या चारचाकी गाडीत घेतले. त्या महिलेच्या अंगावरील दागिने व मोबाईल काढून घेतला. दरम्यान, याप्रकरणी वडगाव पोलिसांत गुन्हा दाखल होता. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना या गुन्ह्यातील टोळी उस्मानाबाद व बीड या जिल्ह्यांतील असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथक या जिल्ह्यामध्ये गेले. पोलिसांनी संशयित तुकाराम मुंडे, आक्का मुंडे, राम इटकर या तिघांना पकडले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी तिघांना अटक केली. तपासात संशयित साधू ढिगारे, गोकुळ इटकर हेही असल्याचे निष्पन्न झाले. इंदापूर पोलीस ठाण्याकडे अटकेत असलेल्या साधू ढिगारेला तर संशयित गोकुळ इटकर व ईश्वर दुबळे यांना सोनारी येथून अटक केली. या टोळीतील अशोक सांगळे (रा. बीड), नजीर (पूर्ण नाव माहीत नाही) व पप्पी (पूर्ण नाव माहीत नाही) या तिघा संशयितांचा शोध सुरू असल्याचे गोयल यांनी सांगितले.या टोळीचा छडा पोलीस निरीक्षक अनिल देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक रमेश ढाणे, हमीद शेख, आदींनी लावला.