जयसिंगपूरजवळ अपघातात महिला जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:22 AM2021-04-14T04:22:29+5:302021-04-14T04:22:29+5:30

शिरोळ : धरणगुत्ती (ता. शिरोळ) येथील नांदणी नाका परिसरात ट्रकच्या धडकेत महिला जागीच ठार झाल्याची घटना घडली. वालूबाई उमेश ...

Woman killed on the spot in accident near Jaisingpur | जयसिंगपूरजवळ अपघातात महिला जागीच ठार

जयसिंगपूरजवळ अपघातात महिला जागीच ठार

Next

शिरोळ : धरणगुत्ती (ता. शिरोळ) येथील नांदणी नाका परिसरात ट्रकच्या धडकेत महिला जागीच ठार झाल्याची घटना घडली. वालूबाई उमेश चव्हाण (वय ४०, रा. लमाण वसाहत, धरणगुत्ती) असे मृत महिलेचे नाव असून, मंगळवारी सकाळी साडेसहाच्यासुमारास कोहिनूर हॉटेलसमोर हा अपघात झाला. याप्रकरणी ट्रकचालक हणमंत गुराप्पा राठोड (वय २५, रा. मारणाळ तांडा, ता. सुपूर, जि. यादगीरी, कर्नाटक) याच्यावर शिरोळ पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला असून, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी सांगितले की, नांदणी नाका चौक ते चौंडेश्वरी फाटा बायपास मार्गावरुन मंगळवारी सकाळी वालूबाई चव्हाण या ट्रॅक्टरवर दगडाची कपरी भरण्यासाठी कामावर पायी जात होत्या. यावेळी संशयित ट्रकचालक राठोड याने ट्रक (क्र. के ए ३३ बी ९०१३) हा भरधाव वेगाने चालवून चव्हाण या महिलेस पाठीमागून जोराची धडक दिली. यावेळी ती महिला खाली कोसळली. ट्रकचे पाठीमागील चाक तिच्या डोक्यावरुन गेल्याने ती गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाली. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबतची तक्रार विलास जाधव यांनी शिरोळ पोलिसांत दिली. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सरनाईक करीत आहेत.

फोटो - १३०४२०२१-जेएवाय-०७-मृत वालूबाई चव्हाण

Web Title: Woman killed on the spot in accident near Jaisingpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.