विश्वास पाटीलकोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद महिलांसाठी खुले झाल्याने नेत्यांनी आपल्या पत्नीसह, लेकी, सुना यांना मैदानात उतरवण्याची जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे त्या त्या मतदारसंघातून आपल्यालाही संधी मिळेल या आशेवर पक्षाचे काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांच्या भावनांचा चुराडा होणार आहे. एकाच घरात अनेक वर्षे सत्तेची महत्त्वाची पदे असतानाही नेत्यांना सत्तेची हाव सुटायला तयार नाही, असेच चित्र दिसत आहे.अध्यक्षपदाला राज्यमंत्री पदाचा दर्जा असतो. शिवाय ते मानाचे पद असल्याने ज्यांना विधानसभेला संधी मिळत नाही, असे नेते या पदासाठी आतापासूनच फिल्डिंग लावू लागले आहेत. नगरपालिका, महापालिकाप्रमाणेच जिल्हा परिषदेलाही कार्यकर्त्यांना सतरंजी झाडायचेच काम वाटणीला येण्याची चिन्हे आहेत.
१,कागल तालुक्यातील सिद्धनेर्ली मतदारसंघातून सुयशा अंबरीश घाटगे या मैदानात उतरणार आहेत. त्या भाजपच्या उमेदवार असतील. मंत्री हसन मुश्रीफ यांचीही ताकद त्यांच्यामागे असेल. त्या यापूर्वीही जिल्हा परिषदेला निवडून आल्या होत्या. अंबरीश घाटगे हे जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती होते. आता ते गोकूळचे संचालक आहेत. त्यांचे वडील संजयबाबा घाटगे अनेक वर्षे कागल पंचायत समितीचे सभापती होते. आता ते जिल्हा बँकेचे संचालक आहेत.२.शाहूवाडी तालुक्यातील पिशवी-बांबवडे मतदारसंघातून राजकुंवर रणवीर गायकवाड या निवडणूक लढवणार आहेत. त्यांचा माहेरचा नागरिकांचा मागास प्रवर्गाचा दाखला आहे. त्याआधारे ओबीसी पुरुष गटातून निवडणूक लढवून त्या अध्यक्षपदाच्या दावेदार होऊ इच्छितात. त्यांचे पती रणवीर हे जिल्हा बँकेचे संचालक आहेत. राजकुंवर यांच्या सासू शैलजा गायकवाड या जिल्हा परिषदेत निवडून येऊन सभापती झाल्या होत्या.
वाचा: जिल्हा परिषदेसाठी पक्ष, गटतटाचे राजकारण उफाळले; गोपाळराव भाजपसोबत, तर ए. वाय. यांची काँग्रेसला साथ३.भाजपचे इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे यांची कन्या सानिका कोरोची मतदारसंघातून लढणार आहेत. त्या आमदार राजेंद्र यड्रावकर यांच्या होणाऱ्या सून आहेत. निवडणुकीमुळे त्यांचा विवाह लांबणीवर टाकला आहे. महापालिका निवडणुकीत त्या प्रचारात सक्रिय होत्या. आवाडे-यड्रावकर यांची भाजप-शिंदेसेनेची ताकद एकवटली तर त्या प्रबळ दावेदार ठरू शकतात.४.राधानगरी तालुक्यात खरी धुमश्चक्री आहे. तिथे कसबा तारळे मतदारसंघातून गोकूळचे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांची कन्या अमृता राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून तयारीत आहेत. याच पक्षाकडून माजी आमदार के. पी. पाटील यांची कन्या व भोगावतीचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील यांची पत्नी रुपाली यांनीही तयारी केली आहे. भोगावतीचे संचालक धीरज डोंगळे यांच्या पत्नी भाग्यश्री या काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. याच मतदारसंघातून ऋतुजा रविश पाटील कौलवकर यांनीही भाजपकडून दावा केला आहे. या लढतीमागेही अध्यक्षपदाची आशाच आहे.
वाचा: ‘महाविकास’मध्ये मिटतंय तर ‘महायुती’मध्ये पेटलंय!; अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस५.जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी आपण ही निवडणूक लढणार नसल्याचे परवाच जाहीर केले होते. परंतु कुंभोज मतदारसंघातील इच्छुकांनी त्यांनीच निवडणूक लढवावी असा आग्रह धरल्याने त्या पुन्हा भाजपकडून मैदानात येऊ शकतात. त्या गोकूळच्या संचालिका आहेत.६.गडहिंग्लज तालुक्यातील गिजवणे मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्या पत्नी शैलजा पाटील या राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून निवडणूक लढवणार आहेत.७.चंदगड तालुक्यातील कुदनूर मतदारसंघातून भाजपकडून माजी राज्यमंत्री भरमू पाटील यांच्या सून ज्योती दीपक पाटील या लढणार आहेत. ही त्यांची तिसरी टर्म आहे. त्यांनी जिल्हा परिषदेत महिला बालकल्याण सभापती म्हणूनही काम केले आहे.८.कागल तालुक्यातील बोरवडे मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनोज फराकटे यांच्या आई शोभा गणपतराव फराकटे या लढणार आहेत. त्या यापूर्वी पंचायत समिती सदस्या होत्या. तिथे राष्ट्रवादी अजित पवार पक्षात बंडखोरी होण्याची चिन्हे आहेत. पक्षाच्या महिला अध्यक्षा शीतल फराकटे यांनी आपण लढणार असल्याचे जाहीर केले आहे. मी कार्यकर्ती आहे आणि पक्षासोबत राहून संधी मिळणार नसेल तर लढण्याशिवाय गत्यंतर नाही असे त्यांचे म्हणणे आहे.९. करवीर तालुक्यातील शिंगणापूर संघातून काँग्रेसकडून रसिका अमर पाटील या पुन्हा मैदानात उतरत आहेत. गेल्या निवडणुकीत त्या अपक्ष निवडून आल्यावर त्या शिक्षण सभापती झाल्या होत्या. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांच्या त्या सून आहेत.
Web Summary : Kolhapur ZP president post open for women sparks family competition. Leaders promote wives, daughters, sidelining dedicated party workers. Dynastic politics overshadows grassroots aspirations.
Web Summary : कोल्हापुर जेडपी अध्यक्ष पद महिलाओं के लिए खुलने से पारिवारिक प्रतिस्पर्धा। नेता पत्नियों, बेटियों को बढ़ावा देते हैं, समर्पित पार्टी कार्यकर्ताओं को दरकिनार करते हैं। वंशवादी राजनीति जमीनी आकांक्षाओं पर भारी।