शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लज सभेत वादळी चर्चा

By admin | Updated: January 21, 2015 23:49 IST

पंचायत समिती सभा : आरोग्य, एस.टी., कृषी धारेवर; गैरहजर पाच विभागांचा निषेध

गडहिंग्लज : तब्बल तीन तास चाललेल्या गडहिंग्लज पंचायत समितीच्या मॅरेथॉन मासिक सभेत वादळी चर्चा झाली. आरोग्य, एस.टी., व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना सदस्यांनी धारेवर धरले, तर सभेस अनुपस्थितीत राहिलेल्या जीवन प्राधिकरण, पाटबंधारे, महसूल, उपसा जलसिंचन, लघू पाटबंधारे या पाच खात्यांसह उपजिल्हा रूग्णालयाच्या प्रमुखांचा निषेध नोंदविण्यात आला.मुंगूरवाडीच्या वैद्यकीय अधिकाऱ्याची हलकर्णीत पूर्णवेळ नेमणूक करावी, अशी आग्रही मागणी केल्यामुळे मुंगूरवाडीच्या डॉक्टरांची हलकर्णीत बदली करण्याचा ठराव एकमताने करण्यात आला. आजूबाजूच्या खेड्यात शोध घेऊन पिसाळलेली कुत्रे ठार मारण्याची सूचना अमर चव्हाण यांनी केलीअनेक वर्षे मागणी करूनही तेरणी-कळविकट्टे बससेवा सुरू होत नसल्यामुळे हलकर्णीत रास्ता रोको करण्याचा इशारा नाईक यांनी दिला. रस्त्याच्या डागडुजीनंतर बसफेरी सुरू करण्याची ग्वाही वाहतूक नियंत्रक मारूती सावंत यांनी दिली. चन्नेकुप्पी व कुंबळहाळ येथे वाहतुकीला अडथळा ठरणारे खडीचे ढीग काढावेत, अशी मागणीही त्यांनी केली.पंचायत समिती कृषी विभागाला काही कामच उरलेले नाही, असा आरोप अमर चव्हाण यांनी केला. कागदी घोडे नाचवू नका, बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा, अशी सूचनाही त्यांनी केली. जादा दराने सोयाबीन बियाणे विकणाऱ्या दुकानदारांवर काय कारवाई केली ? या त्यांच्या प्रश्नावर चौकशीचे आश्वासन उपसभापतींनी दिले.खास समिती नेमून तालुक्यात राबविण्यात आलेल्या नळ योजनांच्या कामांचा आढावा घ्यावा, अशी हेमंत कोलेकर यांनी केलेली सूचना मान्य करण्यात आली. सामानगडावरील इमारती पंचायत समितीकडे वर्ग करण्याचा ठराव झाला. जलयुक्त शिवार योजना, शिष्यवृत्ती परीक्षा यावरही चर्चा झाली. ज्येष्ठ अभिनेत्री बेबी शकुंतला, बी. जी. कुंभार, शहीद जवान सुनिल जोशिलकर, कांता पाटील, सोनाबाई माळी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी हवाहलकर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रात पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे रूग्णांची हेळसांड सुरू आहे. पिसाळलेले कुत्रे चावून जखमी झालेल्या रूग्णांना उपचारांसाठी कोल्हापूरला पाठविले गेले. अनेक वर्षे मागूनही डॉक्टर मिळत नाही. वरिष्ठांनी आदेश देऊनही पर्यायी व्यवस्था होत नसल्याबद्दल बाळेश नाईक यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.‘सभापती’च उशिरा आल्यादस्तुरखुद्द सभापती अनुसया सुतार या सभा सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासाने सभेला आल्या. तत्पूर्वी उपसभापती तानाजी कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सभा सुरू झाली होती.