शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

आजऱ्यातील लाभार्थी कधी पात्र ठरणार ?

By admin | Updated: August 14, 2015 23:10 IST

श्रावणबाळ योजना : कागलमध्ये प्रक्रिया सुरू; आजराकरांना प्रतीक्षा

कृष्णा सावंत- पेरणोली  श्रावणबाळ योजनेतील अपात्र लाभार्थ्यांना पात्र करण्याची प्रक्रिया कागल तहसीलदारांनी सुरू केली आहे. त्याचप्रमाणे आजरा तालुक्यातील अपात्र ठरविलेल्या लाभार्थ्यांना पात्र करण्याची प्रक्रिया कधी राबविणार, अशी विचारणा तालुक्यातील लाभार्थ्यांमधून होत आहे.कागल तालुक्यात राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनामुळे तीन हजार अपात्र लाभार्थ्यांना पुन्हा पेन्शन योजना सुरू होणार आहे. मुश्रीफ यांनी शासनाच्या परिपत्रकाच्या आधारावर समितीने मंजूर केलेली पेन्शन योजना नामंजूर करता येत नसल्याचे संपूर्ण जिल्ह्याला दाखवून दिले आहे. त्यामुळे खरोखर पात्र असूनही अपात्र ठरविलेल्या लाभार्थ्यांना पुन्हा आशा निर्माण झाली आहे. आजरा तालुका हा दुर्गम तालुका आहे. वाड्या-वस्त्यावर शेतात शेतमजुरी करणारी जनता अधिक आहे. येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांची मुले मजुरी, हॉटेल कामगार, बांधकाम कामगार, आदी कामे करतात. त्यामुळे आजऱ्याच्या तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे यांच्या प्रयत्नांमुळे पहिल्यांदाच एकाचवेळी एक हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांना पेन्शन योजना मंजूर झाली. मात्र, मध्यंतरी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून फेर चौकशीमधून अपात्र करण्याचा धडाका लावला. त्यात काही खरोखर पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांच्या तसेच दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांचा समावेश झाल्याने त्यांच्यावर अन्याय झाला आहे. याबाबत आजरा येथील सामाजिक संवेदना संस्थेमध्ये निवेदन दिले आहे. केवळ ३५० लाभार्थ्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. यामधील काही लाभार्थी वगळता बहुतांश लाभार्थी पात्र आहेत. आजऱ्यातील तहसीलदारांची प्रतिमा सामाजिक बांधीलकी जपणारी अशी असल्याने आजरा तालुक्यातही कागलप्रमाणे प्रक्रिया राबवून बंद झालेली पेन्शन पुन्हा सुरू होण्याची लाभार्थ्यांना प्रतीक्षा आहे.कागल तालुक्याप्रमाणे आम्हीसुद्धा बंद झालेल्या पेन्शनधारकांची पेन्शन सुरू करणार आहोत. त्या लाभार्थ्यांची जनसुनावणी घेऊन पात्र की अपात्र ठरविण्यात येणार आहे.- श्रीमती शिल्पा ठोकडे,तहसीलदार, आजरा.