शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदेशीर नोकरभरतीबाबत जाब विचारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 12:48 IST

सभासदांनी नामंजूर स्टाफिंग पॅटर्न केलेला असताना, खोटे प्रोसीडिंग रचून प्राथमिक शिक्षक बँकेत सत्ताधाऱ्यांनी नोकरभरती केली आहे. ही बेकायदेशीर भरती आणि अवास्तव खर्चाबाबत उद्या, रविवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत जाब विचारण्याचा निर्धार प्राथमिक शिक्षक बँक बचाव कृती समितीने केला आहे, असे या समितीचे जिल्हाध्यक्ष अर्जुन पाटील यांनी  येथे  सांगितले.

ठळक मुद्देप्राथमिक शिक्षक बँक बचाव कृती समितीचा निर्धारताळेबंद फसवा असल्याचा आरोप

कोल्हापूर : सभासदांनी नामंजूर स्टाफिंग पॅटर्न केलेला असताना, खोटे प्रोसीडिंग रचून प्राथमिक शिक्षक बँकेत सत्ताधाऱ्यांनी नोकरभरती केली आहे. ही बेकायदेशीर भरती आणि अवास्तव खर्चाबाबत उद्या, रविवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत जाब विचारण्याचा निर्धार प्राथमिक शिक्षक बँक बचाव कृती समितीने केला आहे, असे या समितीचे जिल्हाध्यक्ष अर्जुन पाटील यांनी  येथे  सांगितले.जिल्हाध्यक्ष पाटील म्हणाले, सहकार आयुक्तांचे निकष आणि सभासदांचा विरोध डावलून सत्ताधाऱ्यांनी जवळपास ३० कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. त्यात त्यांचे आप्तेष्ट, नातेवाइकांचा समावेश आहे. या भरतीविरोधात समितीने सहकार आयुक्तांकडे तक्रार केली आहे.

सेवेत आणि निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी ही पुढील टप्प्यात देण्याचा करार करून प्रत्यक्ष देणी या वर्षी मांडली नसल्याने बँकेचा ताळेबंद हा फसवा, खोटा आहे. त्यात प्रत्यक्षात दीड कोटीचा नफा दाखविलेला आहे. २२ कोटी रुपयांच्या भाग भांडवलाचे १२ अधिक दोन टक्क्यांनी डिव्हिडंडचे तीन कोटी आठ लाख रुपये होतात. अवास्तव खर्च आणि बेकायदेशीर नोकरभरतीविरोधात कृती समितीच्या वतीने सर्वसाधारण सभेमध्ये जाब विचारण्यात येणार आहे.या पत्रकार परिषदेस महिला राज्याध्यक्ष वर्षा केनवडे, कृष्णात धनवडे, रविकुमार पाटील, कृष्णात कारंडे, सुनील पाटील, प्रमोद तौंदकर, सुरेश कांबळे, राजेंद्र पाटील, मारुती पाटील, संजय कुुंभार, विष्णू जाधव, बाजीराव पाटील, दीपक जगदाळे, अशोक चव्हाण, बाबा धुमाळ, आदी उपस्थित होते.सत्ताधाऱ्यांनी केलेला अवास्तव खर्चसत्ताधाऱ्यांनी अवास्तव खर्च केला आहे. त्यात सन २०१४ ते २०१९ दरम्यान लीजलाईनवर ६३,५०,६५० रुपये, संगणक देखभाल-दुरुस्तीवर १,३१,९१८४५ रुपये, तर एटीएम व्यवस्थित चालू नसताना २०,१६,१६० रुपयांचा समावेश आहे. बँकेची निवडणूक मे २०२० मध्ये होणार असल्याने गेली चार वर्षे सभासदांना ठेवींवर योग्य व्याज दिलेले नाही. सभासदांना अगदी तुटपुुंजा डिव्हिडंड दिला आहे. सत्ताधाऱ्यांनी सभासदांची पिळवणूक केली असल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष पाटील यांनी केला.

 

टॅग्स :Teacherशिक्षकkolhapurकोल्हापूर