शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

पुरेसे शिक्षक, पुस्तके नसताना भाषा वाढवण्याचा आग्रह कशाला?, पृथ्वीराज चव्हाण यांची विचारणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 18:58 IST

कसाही मोर्चा काढा; पण, मराठीवर अन्याय नको!

कोल्हापूर : सध्या सुरू असलेला भाषेचा वाद निरर्थक असून, प्राथमिक, माध्यमिक व उच्च शिक्षणावर मोठ्या प्रमाणात खर्च करण्याची गरज आहे, असा सल्ला देत एकीकडे शिक्षक नाहीत, पुस्तके नाहीत असे असताना भाषा वाढवण्याचा आग्रह कशाला, असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना सरकारला केला.चव्हाण म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकारने शिक्षणावरचा खर्च कमी केला आहे. कितीही भाषा ठेवा; पण शिकवायला मूलभूत सामग्री नाही. शिक्षणाची दुर्दशा झाली आहे आणि दुसऱ्या बाजूला भाषेचा मुद्दा काढत आहेत. प्राथमिक, माध्यमिक किंवा उच्च शिक्षण असेल त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात खर्च करण्याची गरज असून, बाकीचे सर्व निरर्थक वाद आहेत. देशाला लिंक लँग्वेज म्हणून हिंदी भाषेचा वापर होतो. इंग्रजी ही ज्ञान भाषा आहे. इंग्रजीमध्ये जेवढे नवीन संशोधन होत आहे ते इतर कोणत्याही भाषेत होत नाही. मात्र, इंग्रजीला बाजूला करा आणि स्थानिक भाषांचे महत्त्व कमी करा यासाठी एक एक प्रयत्न सुरू असल्यानेच हा गदारोळ उठला असल्याची टीका त्यांनी केली. विद्यमान सरकार मराठीला विरोध करू शकणार नाही; पण, ज्या प्रकारे नवीन शैक्षणिक धोरण राबविले जात आहे त्यावरून त्यांना हिंदी ही एकच भाषा ठेवायची आहे असे दिसते. हे मुळात चुकीचे धोरण आहे. तीन भाषेचे धोरण आपण पूर्वीपासून स्वीकारले आहे, त्यामुळे हिंदी सक्ती चुकीची असल्याचे त्यांनी सांगितले.

कसाही मोर्चा काढा; पण, मराठीवर अन्याय नको!मनसे आणि शिवसेनेच्या वतीने काढल्या जाणाऱ्या मोर्चात सहभागी व्हायचे की नाही ते प्रदेशाध्यक्ष ठरवतील. सर्वांनी मोर्चात सहभागी व्हावे, ही राज ठाकरे यांची पॉलिटिकल ॲक्शन आहे. कसा मोर्चा काढायचा हा त्यांचा भाग आहे; पण, मराठीवर अन्याय होता कामा नये, ही आमची भावना असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.