शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

मूल्यमापनासाठी शासनाची ‘डाएट’ असताना बाह्यसंस्था कशाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शिक्षकांचे मूल्यमापन करण्यासाठी राज्य शासनाची जिल्हा प्रशिक्षण संस्था (डाएट) ही अधिकृत प्रशासकीय यंत्रणा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : शिक्षकांचे मूल्यमापन करण्यासाठी राज्य शासनाची जिल्हा प्रशिक्षण संस्था (डाएट) ही अधिकृत प्रशासकीय यंत्रणा आहे. मग, ३० कोटी रुपये खर्च करून बाह्यसंस्थेकडून मूल्यमापन करण्याचा घाट शालेय शिक्षण विभाग कशाला घालत आहे, असा सवाल कोल्हापुरातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांनी उपस्थित केला. बाह्यसंस्थेच्या माध्यमातून मूल्यमापन करण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय हा शासनाच्या सन १९८१ च्या सेवाशर्ती नियमावलीला छेद देणारा असल्याने त्याला विरोध केला जात आहे. हा निर्णय रद्द होईपर्यंत आंदोलन करण्याचा निर्धार केला असल्याचे शिक्षकांनी सांगितले.

दरवर्षी शालेय तपासणीमधून शिक्षणाधिकारी किंवा विस्तार अधिकारी यांच्यामार्फत तसेच मुख्याध्यापकाद्वारा शिक्षकांच्या कामाचे मूल्यमापन होतच असते. तरीही बाह्यसंस्थेमार्फत विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन शिक्षकांचे मूल्यमापन करणे ही बाब सेवाशर्ती नियमावलीस धरून नाही. मूल्यमापन करायचेच असेल, तर शिक्षण विभागामार्फत करावे, अशी मागणी शिक्षकांनी केली आहे.

चौकट

तीव्र आंदोलन करणार

राज्यातील शिक्षकांचे काम अतिशय चांगले आणि दर्जेदार आहे. शिक्षकांच्या मूल्यमापनासाठी ‘डाएट’ ही शासनाची अधिकृत यंत्रणा आहे. ही यंत्रणा असताना बाह्यसंस्थेमार्फत मूल्यमापनाचा निर्णय म्हणजे शिक्षकांवर अविश्वास दाखविण्याचा प्रकार आहे. सेवाशर्ती नियमावलीला छेद देणारा निर्णय असून तो चुकीचा आहे. हा निर्णय शासनाने रद्द करावा, अन्यथा त्यासाठी तीव्र आंदोलन केले जाणार असल्याचे कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड यांनी सांगितले.

शिक्षक संघटनांचे पदाधिकारी म्हणतात?

विद्यार्थ्यांच्या लेखी चाचणीवरून शिक्षकांचे बाह्य संस्थेमार्फत मूल्यमापन करण्याचा निर्णय चुकीचा आहे. खाजगी संस्थेला पैसे देऊन हे मूल्यमापन कशासाठी हा प्रश्न शिक्षकांसमोर असून आमचा त्याला विरोध आहे. तेच पैसे शासनाने विना अनुदानित शाळांच्या अनुदानासाठी उपयोगात आणावेत अथवा गरीब विद्यार्थ्यांना मोबाइल, टॅब हे ऑनलाइन शिक्षणासाठी द्यावेत.

-संतोष आयरे, राज्य कार्याध्यक्ष, खाजगी शिक्षक महासंघ.

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर शिक्षकांचे पगार ही संकल्पनाच गंभीर बाब आहे. डोंगराळ, दुर्गम भागातील गरीब मुले काम करून शिकतात. अशा वेळी शाळांमध्ये त्याची शंभर टक्के उपस्थिती नसते. या मुलांना अध्यापन करून शिक्षकांना शिक्षण प्रवाहात ठेवतात. अशा विद्यार्थ्यांच्या निकालावरून शिक्षकांचे मूल्यमापन करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे हा निर्णय शासनाने रद्द करावा.

-राजेश वरक, उपाध्यक्ष, पुणे विभाग, शिक्षक लोकशाही आघाडी.

शाळांची वार्षिक तपासणी आणि डाएटकडून शिक्षकांचे मूल्यमापन होत असताना पुन्हा बाह्यसंस्थेद्वारे मूल्यमापन करणे म्हणजे शालेय शिक्षण विभागाचा शासनाच्या यंत्रणेवर विश्वास नसल्याचा प्रकार आहे. विद्यार्थ्यांच्या निकालावर शिक्षकांचे मूल्यमापनाच्या निर्णयात तारतम्य नाही. त्यामुळे हा चुकीचा निर्णय शिक्षण विभागाने त्वरित रद्द करावा.

-खंडेराव जगदाळे, राज्य उपाध्यक्ष, राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समिती.

जिल्ह्यातील आकडेवारी दृष्टिक्षेपात

प्राथमिक शिक्षक : २० हजार

माध्यमिक शिक्षक : १५ हजार