शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
4
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
5
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
6
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
7
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
8
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
9
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
10
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
11
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
12
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
13
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
14
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
15
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
18
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
19
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
20
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
Daily Top 2Weekly Top 5

‘राजलक्ष्मी’ची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:47 IST

विद्यमान नगरसेवक - दीपा मगदूम आत्ताचे आरक्षण - सर्वसाधारण लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : मतदारसंख्येने सर्वांत मोठा असलेल्या ‘राजलक्ष्मीनगर’ ...

विद्यमान नगरसेवक - दीपा मगदूम

आत्ताचे आरक्षण - सर्वसाधारण

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : मतदारसंख्येने सर्वांत मोठा असलेल्या ‘राजलक्ष्मीनगर’ प्रभागात कमालीची चुरस निर्माण झाली असून, येथील मतदार कोणाच्या गळ्यात विजयाची माळ टाकणार, तसेच परंपरागत उमेदवाराला संधी देणार की नव्या दमाच्या उमेदवाराला, याची उत्कंठा लागून राहिली आहे. निवडून कोण येणार, याचा अंदाच आताच वर्तविणे घाईचे ठरणार असले तरी खरी लढत काँग्रेस विरुद्ध भाजप यांच्यातच होईल, हे निर्विवाद आहे.

‘कोल्हापूर दक्षिण’च्या निवडणुकीत नेहमी महत्त्वाची भूमिका बजावणारा राजलक्ष्मीनगर प्रभाग नेहमी चर्चेत राहतो. जशी उमेदवारांची जोरात तयारी असते, तसे नेते मंडळींचीही असते. यावेळच्या निवडणुकीतही नेते मंडळींचा सक्रिय सहभाग पाहायला मिळेल. त्यामुळे नेत्यांचे येणे-जाणे अलीकडे काही ना काही निमित्ताने वाढलेले आहे.

गत निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या प्रभागातील निवडणूक प्रतिष्ठेची केली होती, त्यामुळे विद्यमान पालकमंत्री सतेज पाटील यांनीही आपली सगळी ताकद पणाला लावली होती. शोभा दत्तात्रय बामणे यांना भाजपने, तर दीपा दिलीप मगदूम यांना काँग्रेसने उमेदवारी दिली हाेती; परंतु दिलीप मगदूम यांचे कार्य, अनुभव, तसेच त्यांचे झालेले निधन याची सहानुभूती दीपा मगदूम यांना विजयश्री देऊन गेले. या लढाईत शिवसेनेच्या आरती इंद्रजित साळोखे व राष्ट्रवादीच्या अंजली आंबेकर यांचा टिकाव लागला नाही.

गेल्या पाच वर्षांत मंत्री सतेज पाटील, आ. ऋतुराज पाटील यांच्या सहकार्यामुळे दीपा मगदूम यांनी प्रभागात बरीच कामे केली असून, तीच त्यांची मोठी जमेची बाजू आहे. त्यांचे पुत्र दिग्विजय यांचा प्रभागात चांगला संपर्क आहे. मगदूम नावाची घराघरात ओळख आहे. तरीही त्यांच्याविषयी राजलक्ष्मीनगरमध्ये काहीसी नाराजी दिसून आली. प्रत्येक वर्षीच्या पावसाळ्यात तेथील अनेक घरांत शिरणारे पावसाचे पाणी हे त्याचे कारण आहे. यावेळची निवडणूक दीपा मगदूम स्वत: लढणार की त्यांचे पुत्र दिग्विजय, हे अद्याप ठरलेले नाही; पण मगदूम यांचा उमेदवार नक्की असणार आहे.

या प्रभागात भाजपचे मतदान असल्याचे गत निवडणुकीतून दिसून आले आहे. त्यामुळे भाजपची उमेदवारी मिळावी यासाठी राजेश कोगनोळीकर, मिलिंद पाटील, तसेच मूळचे शिवसैनिक असलेले सुधीर राणे प्रयत्न करीत असल्याचे सांगण्यात येते. यापैकी सुधीर राणे यांनी मात्र निवडणूक लढवायचीच या इराद्याने पाच वर्षांपासून प्रभागात संपर्क तर ठेवला आहे, शिवाय अनेक लोकाभिमुख कामेही केली आहेत. प्रधानमंत्री आरोग्य कार्ड, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्रे, शिधापत्रिका काढून देणे अशा कामांसाठी त्यांची एक यंत्रणा काम करीत होती. २०१९ चा महापूर, २०२० चा कोरोना संसर्ग, लॉकडाऊन या काळात त्यांनी चांगली कामे केली आहेत. घराघरात जाऊन त्यांनी स्वखर्चाने पाणी दिले. तरुण रक्त आणि कामाचा आवाका यामुळे त्यांनी प्रभागाचे लक्ष वेधून घेतले आहे. नुकत्याच झालेल्या शिवजयंती, मकर संक्रांतीच्या कार्यक्रमातून त्यांना मिळत असलेल्या प्रतिसादाची चुणूक पाहायला मिळाली. त्यांची उमेदवारी भाजपकडून असेल की शिवसेनेकडून, हे मात्र स्पष्ट झालेले नाही.

८०० ते ९०० मतदार असलेल्या राजलक्ष्मीनगराने मिलिंद पाटील यांना मतदान घेऊन एकमुखी पाठिंबा दिला आहे. त्यांचा नगरात राबता आहे; परंतु अन्य भागांत किती मते घेणार यावरच त्यांचे भवितव्य आहे. माजी नगरसेवक महेश सावंत निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत; परंतु त्यांनी अद्याप आपले पत्ते उघड केलेले नाहीत.

प्रभागात झालेली कामे-

- प्रत्येक कॉलनीत ७० टक्के कामे पूर्ण

- देवकर पाणंद ते पेट्रोल पंप रस्ता

- श्रीकृष्ण कॉलनीतील सांडपाण्यासाठी चॅनलचे काम

- स्वनिधीतून प्रभागात एलईडी बल्ब

- प्रभागात दोन ठिकाणी महिलांसाठी ओपन जीम

- पांडुरंगनगरीत तीन हजार फुटांचा सांस्कृतिक हॉल

- दळवी कॉलनीतील रस्ते, गटारी, पाणी, ड्रेनेजलाइन पूर्ण

प्रभागात न झालेली कामे-

- देवकर पाणंद येथील क्रॉसड्रेनचे काम झालेले नाही

- श्याम हौसिंग सोसायटी येथे ड्रेनेजलाइनचे काम नाही

-शुश्रूषानगर येथील सांडपाणी निर्गतीचे काम प्रलंबित.

नगरसेविकेचा कोट -

गेल्या पाच वर्षांत प्रभागात पाच कोटी ७१ लाखांची विकास कामे पूर्ण केली. अजूनही काही कामे मंजूर आहेत; पण प्रत्यक्षात सुरू झालेली नाहीत. देवकर पाणंद चौकातील पावसाळ्यातील सांडपाण्याच्या प्रश्नाव्यतिरिक्त नागरिकांच्या सर्व समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला आहे.

दीपा मगदूम

गतवेळच्या निवडणुकीत मिळालेली मते -

-दीपा दिलीप मगदूम (काँग्रेस) - १७३०

-शोभा दत्तात्रय बामणे- (भाजप)- १४१८

-आरती इंद्रजित साळोखे (शिवसेना)- ६८२

-अंजली भिकशेठ आंबेकर (राष्ट्रवादी)- ११४