शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

राजेंच्या नादी कोण लागणार

By admin | Updated: May 10, 2015 00:43 IST

शरद पवार : सर्व स्थानिक राजकीय निर्णय साताऱ्यातूनच व्हावेत

सातारा : ‘पहिल्यापासूनच बारामतीपेक्षा साताऱ्याला महत्त्व आहे. महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाणांची ही भूमी आहे. याच ठिकाणाहून सर्व राजकीय निर्णय व्हावेत, अशी माझीही इच्छा आहे,’ असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकाच वाक्यात राजकीय स्थितीवर भाष्य केले. रामराजे व उदयनराजे यांच्यातील वादाबाबत विचारले असता, ‘दोन राजेंमध्ये काय असते, हे तुम्हाला माहीत आहेच. त्यामुळे राजेंच्या नादी कोण लागणार?’ अशी मिश्किलीही त्यांनी यावेळी जोडली. ‘सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मतदारांनी राष्ट्रवादीवर पुन्हा विश्वास ठेवला आहे, या विश्वासास पात्र ठरण्यासाठी त्यांनी आता प्रयत्न केले पाहिजेत,’ असेही शरद पवार यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ‘पवार भाजपच्या जवळ जात आहेत,’ असा आरोप केला होता. त्याबाबत पत्रकारांनी विचारले असता, पवार म्हणाले, ‘अहमदनगर जिल्हा बँकेची निवडणूक काँगे्रसने भाजप व शिवसेनेला सोबत घेऊन लढविली. महाराष्ट्रात कटुता वाढू नये, यासाठी मी काही बोलत नाही. राज्य एकसंध राहावं ही माझी इच्छा आहे. राष्ट्रीय प्रश्नांच्या बाबतीत सर्वांनी एकत्र आलेच पाहिजे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. याचे लोण आता सधन अशा पश्चिम महाराष्ट्रातही पसरले आहे. सरकारने योग्यवेळी निर्णय घेऊन शेतकऱ्यांना या संकटसमयी दिलासा देणे गरजेचे आहे. महाराष्ट्रापासून स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीबाबत शरद पवार म्हणाले, ‘अनेकांनी हौतात्म्य पत्करल्यानंतर महाराष्ट्र राज्य निर्माण झाले आहे. राज्य एकसंध राहिले पाहिजे. ज्यांनी वेगळ्या विदर्भाची मागणी केली, त्या नेत्यांना तेथील जनतेनंच स्वीकारलं नाही. वेगळ्या विदर्भाबाबत येथील जनतेचा कौल महत्त्वाचा आहे. येथील जनताच वेगळ्या विदर्भाच्या निर्णयाबाबत अनुकूल नाही.’ जमीन अधिनियम कायद्याला आपला विरोध असल्याचे स्पष्टीकरण पवारांनी केले. शेतीच्या तुकड्यावरच शेतकरी तग धरून राहतो. आता परस्पर या जमिनी काढून घेतल्या गेल्या, तर तो देशोधडीला लागेल. त्यामुळे केंद्र शासनाच्या भूमी अधिग्रहण कायद्याला आमचा विरोध आहे. लोकसभेत हे विधेयक मंजूर झाले तरी ते राज्यसभेत मंजूर होणारच नाही. (प्रतिनिधी) अशोक चव्हाण म्हणजे लहान मूल ! पवार भाजपच्या जवळ गेले असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला होता. याबाबत पवार यांनी ‘लहान मुलं असं बोलतात. महाराष्ट्रातील कटुता वाढू नये, यासाठी मी त्याला प्रत्युत्तर दिलं नाही,’ असं स्पष्टीकरण केले.