शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

मेरा फरान कहाँ हैं ?

By admin | Updated: February 25, 2015 00:03 IST

अस्वस्थ आईचा प्रश्न : बालक अपहरणाचा तपास संथ

एकनाथ पाटील -कोल्हापूर --दर्शन शहा या शाळकरी मुलाचा खंडणीसाठी खून, गांधीनगर येथील चिराग या बालकाचे खंडणीसाठी अपहरण, अशा गंभीर घटना गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये ताज्या असताना दहा दिवसांपूर्वी कोल्हापुरातील टाऊन हॉल बागेतून अपहरण झालेल्या दोन वर्षाच्या बालकाचा शोध लागलेला नाही. फरान ऊर्फ आयान अकिब जांभारकर (रा. सिद्धार्थनगर) असे त्याचे नाव आहे. पोलिसांचा धाक कमी झाल्याने अशा घटना घडू लागल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. मुलाच्या अपहरणाच्या धक्क्याने आई-वडिलांनी अंथरूण धरले आहे. धीर देण्यासाठी येणाऱ्या नातेवाईक व पोलिसांना ते ‘मेरा फरान कहाँ हैं’, अशी हाक देत आहेत.भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणाहून बालकाचे अपहरण होऊनही लक्ष्मीपुरी पोलिसांचा तपास ‘कासवा’च्या गतीने सुरू आहे. अकिब मन्सूर जांभारकर मुळचे रत्नागिरीचे. वीस वर्षांपासून कोल्हापुरात सिद्धार्थनगराते राहतात. त्यांची टाऊन हॉलजवळ केळीची हातगाडी आहे. व्यवसायामध्ये पत्नीही हातभार लावते. कष्टकरी दाम्पत्यास दोन मुले. नवमान व फरान. नवमान सात वर्षांचा, तर फरान दोन वर्षांचा. पती-पत्नी केळीच्या गाड्यावर उभे राहत असल्याने मुले टाऊन हॉल बागेत खेळतात. सोमवारी(दि. १६) दुपारी दीडच्या सुमारास फरान मुलांसोबत खेळत होता. दुपार नंतर तो गायब झाला. त्याच्यासोबत खेळणाऱ्या मुलांनी त्याचा बागेत शोध घेतल्यावर तो आढळला नाही. त्यांनी त्याच्या वडिलांना हा प्रकार सांगितला. वडिलांनी तो घरी व आजूबाजूला चौकशी केली असता तो आढळला नाही. म्हणून लक्ष्मीपुरी पोलीसांत मंगळवारी (दि. १७) फिर्याद दिली. तेव्हापासून शोध सुरू असल्याचे सांगून पोलीस जबाबदारी झटकत आहेत, असे पालकांचे म्हणणे आहे.रस्त्यावर फिरणाऱ्या भिकाऱ्या महिलेने मुलाचे अपहरण केल्याची माहिती नातेवाइकांना पोलिसांना दिली; परंतु पोलिसांनी फार कांही केलेले नाही. नातेवाइकांचीच रेल्वे, बसस्थानकासह पंढरपूर, मिरज आदी ठिकाणी शोधाशोध सुरू आहे. टोळीकडून अपहरणाची शक्यता नाशिक येथे होणाऱ्या कुंभ मेळाव्यात भीक मागण्यासाठी गुन्हेगारी टोळ्या दिवसाढवळ्या लहान मलांचे अपहरण करीत असल्याची चर्चा आहे. त्याच टोळीकडून फरानचे अपहरण झाल्याची दाट शक्यता असल्याने रस्त्यावर एकटे मुलांना सोडणे धोक्याचे बनले आहे.