शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

वाचन समाजासाठी अत्यावश्यक गरज कधी होणार...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:25 IST

मुरगूड : समाजात वाचनाविषयीची अनास्था दूर होऊन ती आपल्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी व समाजाच्या भल्यासाठी अत्यावश्यक गरज कधी ...

मुरगूड : समाजात वाचनाविषयीची अनास्था दूर होऊन ती आपल्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी व समाजाच्या भल्यासाठी अत्यावश्यक गरज कधी ठरणार, असा सवाल ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक जीवन साळोखे यांनी उपस्थित केला. जागतिक पुस्तक दिनाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. घराघरात सर्व जण एकत्र बसून टीव्ही बघत बसतात, तसे काही काळ सर्वजण पुस्तकांचे वाचन करतील तो दिवस खऱ्या अर्थाने पुस्तक दिन ठरेल, वाचन प्रेरणा दिन ठरेल, अशी अपेक्षाही साळोखे यांनी यावेळी व्यक्त केली. वाचन संस्कृती वाढण्यासाठी, वाचक संस्था विस्तारण्यासाठी गेली १५-१६ वर्षे ते एकहाती ग्रंथदान हा उपक्रम प्रत्यक्षात राबवत असून जिल्ह्यातील अनेक शाळा-महाविद्यालये, वाचनालये, सहकारी शिक्षक, पत्रकार, विद्यार्थ्यांना व मान्यवरांना ते पुस्तके भेट देत आले आहेत. सुमारे ९ हजार पुस्तके त्यांनी या काळात वाटली आहेत.

साळोखे म्हणाले, वाचनाचे, पुस्तकांचे महत्त्व नव्याने सांगण्याची वेळ सध्या आली आहे.

आपल्या भाषेतील उत्तमोत्तम, वाचनीय पुस्तकांकडे पाठ फिरवणे, वृत्तपत्रापलिकडे काही पूरक वाचन करण्याचा कंटाळा करणे यातच आपल्याकडील सुशिक्षित व नोकरीत असणारा मोठा वर्ग धन्यता मानतो. वाचन करणे म्हणजे वेळेची नासाडी करणे, वेळेचा दुरुपयोग आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आपल्या शरीराबरोबरच मनाचे, बुद्धीचे, भावनांचे भरण-पोषण होणे तेवढेच आवश्यक आहे, हे आपण का पटवून घेत नाही, असे ही ते म्हणाले.

एका बाजूस सध्याचे युग हे तीव्र स्पर्धेचे, माहिती व तंत्रज्ञानाचे अद्यावत ज्ञान प्रत्येक क्षेत्रात आवश्यक असणारे युग आहे, असे सर्रास म्हटले जाते. तरीही वाचनाची, पुस्तकांची घोर उपेक्षा सर्वत्र केली जाते, हे चित्र समाजाच्या भल्याचे नाही, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. वाचन संस्कृती योग्यरित्या रुजविल्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठीच ग्रंथदान व पुस्तक भेटीसारखे उपक्रम प्रत्येक वाचनप्रेमी व ग्रंथप्रेमींनी राबवले पाहिजेत, त्यातच जागतिक पुस्तक दिनासारख्या कार्यक्रमांचे यश आहे, असेही साळोखे शेवटी म्हणाले.