शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषण मंडळ कायद्याचा बडगा कधी दाखवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:56 IST

कोल्हापूर : प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषणमुक्तीसाठी वेगळे काही न करता यासाठी जबाबदार असणाऱ्या कारखाने आणि प्रोसेसवर आधी कारवाई करावी. ...

कोल्हापूर : प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषणमुक्तीसाठी वेगळे काही न करता यासाठी जबाबदार असणाऱ्या कारखाने आणि प्रोसेसवर आधी कारवाई करावी. त्यांच्यावर कायद्याचा आधी बडगा उगारावा आणि मग आकडेवारी सांगावी अशा शब्दात अधिकाऱ्यांना धारेवर धरले. जिल्हा परिषदेच्या समिती सभागृहात गुरुवारी जलव्यवस्थापन समितीची सभा झाली. त्यामध्ये हा विषय चर्चेला आला होता. अध्यक्षस्थानी बजरंग पाटील होते.

उपाध्यक्ष सतीश पाटील, सदस्य शिवाजी मोरे यांनी या विषयावर सडेतोड मते मांडली. यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनीही आधी कारवाई करा, अशी सूचना केली. जलजीवन मिशनमधील १६८ पैकी केवळ ६० गावांच्या योजनांचे आराखडे तयार झाले आहेत. अजूनही अनेक गावांचे आराखडेच झालेले नाहीत यावरही सदस्यांनी तीवर नाराजी व्यक्त केली. पाझर तलावांच्या दुरुस्तीसाठी सदस्यांनी प्रस्ताव द्यावेत, अशी सूचना यावेळी करण्यात आली. काही पाझर तलाव अजूनही जिल्हा परिषदेच्या नावावर नसल्याचा मुद्दा यावेळी पुढे आला. तेव्हा संजयसिंह चव्हाण म्हणाले, दुष्काळाच्या काळात यातील काही तलाव खोदले गेले आहेत. त्यामुळे सर्वच जमिनी संपादित केल्या नव्हत्या. मात्र ज्या तलावांच्या जमिनी घेताना नुकसानभरपाई देण्यात आली आहे. त्या जागा जिल्हा परिषदेच्या नावावर करण्यासाठी मोहीम राबविण्यात येईल.

सभेला सभापती हंबीरराव पाटील, प्रवीण यादव, स्वाती सासने, राणी खमलेट्टी, सभापती उदय पोवार, अजयकुमार माने, अरुण जाधव, मनीष पवार, प्रियदर्शिनी मोरे उपस्थित होते.

चौकट

लोकमतमधील मालिकेचा संदर्भ

यावेळी सदस्य प्रा. शिवाजी मोरे यांनी लोकमतमधील पंचगंगा प्रदूषणाबाबतच्या मालिकेचा उल्लेख केला. तेव्हा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतींमुळे प्रदूषण होत असल्याचे सांगितले. तेव्हा मोरे यांनी लॉकडाऊनच्या काळात सर्व कारखाने, प्रोसेस बंद असताना गावातील कारभार सुरू होता. पाणी योजना सुरू होत्या. तरीही पंचगंगेतील प्रदूषण कमी झाले होते. यावर अधिकारी निरुत्तर झाले.