शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

तमदलगेकरांना ‘वारणे’चे पाणी केव्हा?

By admin | Updated: May 12, 2015 00:12 IST

दिवसाआड पाणीपुरवठा : पेयजल योजनेच्या कामास मुहूर्त सापडेना; ‘शासकीय काम सहा महिने थांब’चा अनुभव

संदीप बावचे - जयसिंगपूर -शिरोळ तालुक्यातील तमदलगे राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कामाला मुहूर्त केव्हा सापडणार, असा प्रश्न ग्रामस्थांतून विचारला जात आहे. निविदा निघाली मात्र काम सुरू नसल्यामुळे या योजनेला ‘शासकीय काम सहा महिने थांब’, असाच अनुभव येत आहे. सध्या पाणीटंचाई भासत नसली तरी एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, पाणीटंचाईवर कायमचा तोडगा काढण्यासाठी ही योजना पूर्ण होण्याची गरज आहे.तालुक्यातील टंचाईग्रस्त म्हणून तमदलगे गावाची ओळख आहे. तीन वर्षांपूर्वी दुष्काळग्रस्त गाव म्हणून शासनाने जाहीर केलेले होते. गेल्या दोन वर्षांपासून पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्याने पाझर तलाव चांगला भरत आहे. मुख्य ओढ्यालगतच ग्राम पाणीपुरवठ्याची विहीर आहे. विहिरीतूनच गावात पिण्याचे पाणी पुरविले जाते. विहिरीलगतच जलस्वराज्य प्रकल्प अंतर्गत बांधण्यात आलेला बंधारा आहे. तलावात पाणी असेल तरच बंधारा भरतो व तलावातील पाझर व बंधाऱ्यातील पाझर यावरच विहिरीतील पाणी अवलंबून आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यातच पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते. विहिरीतील पाण्यामुळे सध्या एक दिवसाआड का होईना पाणीपुरवठा केला जात आहे. बंधारा व तलावातील पाणी आटले असले तरी पाझर पाण्यामुळे विहिरीत पाणी साठत आहे. सध्या गावास दैनंदिन १ लाख २० हजार लिटर पाण्याची गरज असली तरी कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे. विहिरीतील फुटव्हॉल्व उघड्यावर पडले आहेत.दरम्यान, गावात सतत पाणीटंचाई भासत असल्यामुळे यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेतून १ कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. गावाच्या जिव्हाळ्याचा या पाणी योजनेचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघेल, अशी अपेक्षा असताना निविदा निघाली आहे. मात्र, जिल्हा परिषदेकडील प्रशासकीय कामाच्या घोळामुळे काम सुरू होण्यास विलंब होत आहे. याबाबत अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. पाणीटंचाई पाचवीला पूजलेले असताना कित्येक वर्षांनंतर वारणा नदीतून पाणी मिळण्याचे स्वप्न पूर्णत्वास येण्याची गरज आहे.एक दिवसाआड पाणीसध्या गावाला एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. यंदा अजून तरी टॅँकरची आवश्यकता भासत नसली तरी तीन कूपनलिका खुदाईची गरज आहे. राष्ट्रीय पेयजल योजना कामासाठी जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती सरपंच पिरगोंडा पाटील यांनी दिली....पण वर्कआॅर्डर नाहीतमदलगे पेयजल योजनेची निविदा निघाली आहे. मात्र, वर्कआॅर्डर मिळाली नसल्यामुळे अजून कामास सुरूवात केलेली नाही. जिल्हा परिषदेकडील प्रशासन निवडणूक प्रक्रियेत होते. आदेशाबाबतची प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल, त्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरूवात करण्यात येणार असल्याची माहिती ठेकेदार कमते यांनी दिली.