शहरं
Join us  
Trending Stories
1
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
2
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
3
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
4
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
5
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
6
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
7
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
8
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
9
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
10
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
11
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
12
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
13
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
14
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
15
भाजप नेत्यांनी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली, PM मोदींचं आवाहन नेते दुसऱ्याच दिवशी विसरले!
16
'या' Infra कंपन्यांची लागली लॉटरी! ११ हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळताच स्टॉक सुस्साट, हाती आला रेल्वे-हायवेचा प्रोजेक्ट
17
Mumbai Crime: ब्युटीशियन मनाली यांची अंबोलीत हत्या; अवघ्या दोन तासांत मित्रास घाटकोपरमध्ये केले अटक
18
संध्याकाळपर्यंत कुणी ओळखत नव्हता, एका रात्रीत बनला हीरो, कोण आहे माधव तिवारी?  
19
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलन करणारे आता गप्प का?

By admin | Updated: January 11, 2015 00:46 IST

अजित पवार यांचा सवाल : नेसरीत राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचा मेळावा

नेसरी : जनता भाजपच्या भूलभुलैयांना भुलली, सोशल नेटवर्किंगचा वापर करून खोटीनाटी माहिती जनतेला पुरविली. देशात उद्योगधंद्यांच्या बाबतीत महाराष्ट्र पुढे असताना गुजरात राज्य पुढे असल्याचा प्रचार केला. टोल बंद करा, एल.बी.टी. रद्द करा, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा म्हणून आंदोलने करणारे आता कुठं गेले? आमचे सरकार असताना आंदोलने करणारे आता गप्पा का? असा सवाल राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारला केला.
येथे राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत हाते. अध्यक्षपदी तालुकाध्यक्ष बी. एन. पाटील-मुगळीकर होते. यावेळी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार के. पी. पाटील, आमदार संध्यादेवी कुपेकर, डॉ. नंदाताई बाभूळकर, आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, नेसरीला वेगळं महत्त्व आहे. पक्षात दोघांनी बंडखोरी केली. मोदी लाटेची हवा असतानाही दिवंगत बाबा कुपेकर यांनी केलेल्या विकासकामांमुळे व निवडून येण्याची क्षमता पाहून आम्ही संध्यादेवी कुपेकरांना उमेदवारी दिली. ती जनतेने सार्थ ठरवत त्यांना दुसऱ्यांदा निवडून दिले. विधिमंडळाचा नेता म्हणून मी आभार मानतो. विरोधी पक्षात असलो तरी काम करण्याची हातोटी असल्याने निधी आणण्यात कुठेही कमी पडणार नाही. आज सगळ्या जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत असताना धर्मांध शक्ती वाढत आहे.
केंद्रामध्ये महाराष्ट्रातील बडे नेते आहेत. त्यांच्याकडे महत्त्वाची खाती आहेत. त्यांनी महाराष्ट्रासाठी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी काहीतरी करून दाखवावं, असे आवाहनही पवार यांनी केले.
यावेळी रामराजे कुपेकर, डॉ. नंदाताई बाभूळकर यांनी संध्यादेवींना कठीण परिस्थितीत साथ देऊन निवडून दिल्याबद्दल जनतेचे आभार मानले. यावेळी आजरा तालुकाध्यक्ष मुकुंदराव देसाई, चंदगड तालुकाध्यक्ष एम. जे. पाटील, रघुनाथ पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
सरपंच वैशाली पाटील यांनी स्वागत केले. जयसिंग चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. मेळाव्यास शोभादेवी शिंदे-नेसरीकर, शिवप्रसाद तेली, सभापती अनुराधा सुतार, अमर चव्हाण, सुजाता पाटील, रामाप्पा करिगार, मुन्नासोा नाईकवडी, कावेरी चौगुले, राजू होलम, विष्णुपंत केसरकर, उपसरपंच दयानंद नाईक, अमर हिडदुगी, आशादेवी तेली, महाबळेश्वर चौगुले, आदींसह आजरा, चंदगड व गडहिंग्लज तालुक्यांतील कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)