शिनोळी येथे सर्व सोयींनीयूक्त ग्रंथालय उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:20 IST2021-01-14T04:20:50+5:302021-01-14T04:20:50+5:30

चंदगड : सीमाभागातील मराठी बांधवांची कर्नाटक सरकारकडून नेहमीच गळचेपी सुरू आहे. त्याविरोधात तेथील मराठी बांधवांचे समर्थन करण्याचे काम बाळासाहेब ...

A well-equipped library will be set up at Shinoli | शिनोळी येथे सर्व सोयींनीयूक्त ग्रंथालय उभारणार

शिनोळी येथे सर्व सोयींनीयूक्त ग्रंथालय उभारणार

चंदगड : सीमाभागातील मराठी बांधवांची कर्नाटक सरकारकडून नेहमीच गळचेपी सुरू आहे. त्याविरोधात तेथील मराठी बांधवांचे समर्थन करण्याचे काम बाळासाहेब ठाकरे यांनी केले. यासाठी सीमाभागातील मराठी बांधवांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सीमाभागात विद्यापीठांतर्गत शैक्षणिक संकुल उभे करत आहोत. या शैक्षणिक संकुलामध्ये सर्व सोयींनीयुक्त असे मोठे ग्रंथालय उभारण्यात येणार आहे. याचा लाभ कर्नाटकातील मराठी विद्यार्थ्यांना होणार असून या शैक्षणिक संकुलाचा तालुक्यातील महाविद्यालयांवर कोणताही परिणाम होणार नसल्याची ग्वाही उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. हलकर्णी येथे ग्रामपंचायतीच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. प्रास्ताविक भरमाण्णा गावडे यांनी केले.

सामंत म्हणाले, आधीपासूनच काजूशी आमचं अतूट नातं आहे. त्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू. पर्यटन, किल्ले व काजू यासाठी या वर्षभरात पायाभूत काम नक्की होईल. संपर्कप्रमुख अरुण दुधवाडकर यांनी, ग्रामपंचायतीची सत्ता ताब्यात असेल तर मोठी सत्ता मिळविण्याला वेळ लागणार नाही. यावेळी चंदगड तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनेला मोठे यश मिळणार असल्याचे सांगितले.

संग्राम कुपेकर, जिल्हाप्रमुख विजय देवणे, चंदगड विधानसभा संघटक संग्रामसिंह कुपेकर, जिल्हा उपप्रमुख प्रभाकर खांडेकर, सहसंपर्क प्रमुख सुनील शिंत्रे, माजी जि. प. सदस्य शिवाजी सावंत यांनीही मनोगत व्यक्त केले.

संंजय पवार, राजू रेडेकर, संभाजी पाटील, कृष्णराव वाईंगडे, रोशन शमनजी, भारती शिंगटे, संज्योती मळवीकर, शांता जाधव, श्वेता नाईक, शांता जाधव, राहुल पाटील, अनिल पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो ओळी:--

हलकर्णी, ता. चंदगड येथे चंदगड तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत बोलताना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, बसलेले अरुण दुधवाडकर, विजय देवणे, संग्राम कुपेकर, प्रा शिंत्रे आदी.

स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याची स्टाईल आता कोल्हापुरातून पुण्यात गेली आहे, असा चिमटा यावेळी मंत्री सामंत यांनी चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता काढला.

Web Title: A well-equipped library will be set up at Shinoli