Kolhapur ZP: आम्हाला कुणाच्याही पाठिंब्याची गरज नाही, सतेज पाटलांच्या गुगलीवर मंत्री आबिटकर यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 16:11 IST2026-02-12T16:10:12+5:302026-02-12T16:11:56+5:30

आमदार राजेंद्र यड्रावकर हे महायुतीचेच घटक

We don't need anyone's support for Kolhapur Zilla Parishad, Minister Abitkar attack on Satej Patil's googly | Kolhapur ZP: आम्हाला कुणाच्याही पाठिंब्याची गरज नाही, सतेज पाटलांच्या गुगलीवर मंत्री आबिटकर यांचा टोला

Kolhapur ZP: आम्हाला कुणाच्याही पाठिंब्याची गरज नाही, सतेज पाटलांच्या गुगलीवर मंत्री आबिटकर यांचा टोला

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी आम्हांला कुणाच्याही पाठिंब्याची गरज नाही. महायुतीच सत्ता स्थापन करेल असा स्पष्ट निर्वाळा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी बुधवारी दिला. राज्यात, नगरपालिका, महापालिका अशा सर्व ठिकाणी महायुतीची सत्ता आहे. त्यानुसार पुढील काही दिवसांत सत्ता स्थापनेची औपचारिकता पूर्ण करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोल्हापुरात जिल्हा परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या २० जागा निवडून आल्या आहेत. त्यांनी मागितला तर काँग्रेस सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा देईल अशी गुगली काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी निकालानंतर टाकली होती. तो संदर्भ घेऊन विचारलेल्या प्रश्नांबाबत मंत्री आबिटकर म्हणाले, जिल्हा परिषदेसाठी आम्हाला कुणाच्या पाठिंब्याची गरज नाही.

वाचा: कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही पंधरा महिन्यांचे?,  प्राथमिक चर्चेची उद्या शक्यता

राज्यात जिथे शक्य असेल तिथे महायुती म्हणून व शक्य नाही तिथे स्थानिक पातळीवर स्वतंत्र लढून नंतर महायुती म्हणून एकत्र येण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार निवडणुका झाल्या. आता जिल्हा परिषदेत एकत्र येऊन महायुती म्हणून सत्ता स्थापन करू. आमदार राजेंद्र यड्रावकर हे महायुतीचेच घटक आहेत. आमचे सहयोगी असून, ते महायुतीसोबत असतील.

Web Title : कोल्हापूर ZP: हमें किसी समर्थन की ज़रूरत नहीं; पाटिल पर आबिटकर का पलटवार

Web Summary : मंत्री आबिटकर ने कहा कि कोल्हापूर जिला परिषद में महायुति स्वतंत्र रूप से सत्ता स्थापित करेगी, बाहरी समर्थन की आवश्यकता नहीं है। उन्होंने सतेज पाटिल के राकांपा को कांग्रेस के समर्थन की पेशकश का खंडन किया और महायुति की एकता पर जोर दिया, जिसमें विधायक राजेंद्र येड्रावकर भी शामिल हैं, जिससे एक संयुक्त सरकार का गठन सुनिश्चित होगा।

Web Title : Kolhapur ZP: No support needed; Abitkar counters Patil's political move.

Web Summary : Minister Abitkar asserted the Mahayuti will independently establish power in Kolhapur Zilla Parishad, dismissing the need for external support. He countered Satej Patil's offer of Congress support to NCP, emphasizing Mahayuti's unity, including MLA Rajendra Yadravkar, ensuring a joint government formation.