शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

रात्रभर वाहतात पाण्याचे लोट

By admin | Updated: November 30, 2014 23:56 IST

शहरात पाण्याचा अपव्यय : ना महापालिकेला जाणीव, ना नागरिकांत जागरूकता

गणेश शिंदे - कोल्हापूर -कोल्हापूर शहरात पाण्याची प्रचंड उपलब्धता असतानाही केवळ निकृष्ट यंत्रणा व पाणी बचतीबाबत जनजागृतीचा अभावामुळे रोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे.शहरात एकूण एक लाख सहा हजार पाणी कनेक्शन आहेत. त्यापैकी घरगुती एक लाख दोन हजार, औद्योगिक बाराशे तर व्यावसायीक दोन हजार कनेक्शन आहेत. महापालिकेला शिंगणापूर योजनेतून रोज १२० एमएलडी (म्हणजे १२ कोटी लिटर) पाणी उपसा होते. त्यातील शहराला सुमारे ८५ एमएलडी पाण्याचा वापर होतो. त्यातील हजारो लिटर पाणी घरगुती नळ बंद नसल्याने तर कांही नळांच्या चाव्याच गायब असल्याने वाया जाते. तर जलवाहिनीच्या एअर व्हॉल्व्हमधूनही मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. यामुळे सांडपाण्याचा प्रश्नही गंभीर बनत चालला आहे. ‘गळक्या’ योजनेचा हातभारशिंगणापूर योजनेमधून शहराला पाणी येते; पण महिन्यातून एकदा तरी या गळक्या योजनेला महापालिकेला सामोरे जावे लागते. कधी व्हॉल्व्हचे काम, तर कधी पाणी उपसा केंद्रातील गाळ काढण्याचे काम, अशी कारणे आहेत. त्यासाठी प्रशासन पैसे खर्च करते; पण हा पैसा पाण्यासारखा वाहून जातो.ग्राहकांनी नळाला उच्च दर्जाच्या चाव्या बसवाव्यात. जेणेकरून पाण्याच्या अपव्ययाचा भुर्दंड त्यांना बसणार नाही.- मनीष पवार, जलअभियंता, महापालिकापहाटे पाणी आल्यानंतर तातडीने उठून चावी बंद करण्याची तसदी लोक घेत नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी घरगुती चाव्यांचे पाणीही वाहत असते. वृत्तपत्र विक्रेते पहाटे अनेक ठिकाणी रोज हे नळ बंद करतात; परंतु दुसऱ्या दिवशीही तीच परिस्थीती असते.- किरण व्हनगुत्ते,ज्येष्ठ वृत्तपत्र विके्रते, कोल्हापूर.वृत्तपत्र विक्रेते, ज्येष्ठ नागरिकांची मदतशहरात सुमारे एक लाख २६ हजार मिळकतधारक आहेत. त्यांतील एक लाख सहा हजार हजार नळ कनेक्शन आहेत. मात्र, या नळाच्या तोट्या कधी गायब, तर कधी नळ अखंडपणे सुरू असतात. रात्री दोन वाजल्यापासून पाणी सुरू होते; ते सकाळी सहा वाजेपर्यंत तसेच वाहून जाते. याचवेळी प्रत्येकाच्या घरोघरी वृत्तपत्र टाकणारे विक्रेते, सकाळी फिरण्यासाठी जाणारे ज्येष्ठ नागरिक या सुरू असलेल्या चाव्या बंद करून पाण्याचा अपव्यय टाळताना दिसतात.