हिडदुगी प्राथमिक शाळेस वॉटर फिल्टर भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:20 IST2021-04-03T04:20:29+5:302021-04-03T04:20:29+5:30

हिडदुगी प्राथमिक शाळेस अ‍ॅक्वा वॉटर प्युरीफायर वॉटर फिल्टर अनिल पाटील यांनी भेट केला. संपूर्ण महाराष्ट्रातून ‘एनसीईआरटी’ मार्फत दिल्ली येथील ...

Water filter visit to Hiddugi Primary School | हिडदुगी प्राथमिक शाळेस वॉटर फिल्टर भेट

हिडदुगी प्राथमिक शाळेस वॉटर फिल्टर भेट

हिडदुगी प्राथमिक शाळेस अ‍ॅक्वा वॉटर प्युरीफायर वॉटर फिल्टर अनिल पाटील यांनी भेट केला. संपूर्ण महाराष्ट्रातून ‘एनसीईआरटी’ मार्फत दिल्ली येथील नॅशनल कॉन्फरन्ससाठी या शाळेची निवड झाली होती. पाटील हे सध्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मुंबई येथे कार्यरत आहेत. पालक समितीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबुराव सुतार, विलास पाटील, आदित्य पाटील, सुनीता पाटील, मेघना पाटील, वैष्णवी पाटील, प्रभाकर राजगोळे, भागोजी गुुुरव, दयानंद खतकर, बाबुराव सुतार उपस्थित होते. विकास पाटील यांनी आभार मानले.

------------------------

* फोटो ओळी : हिडदुगी (ता. गडहिंग्लज) येथील प्राथमिक शाळेस वॉटर प्युरीफायर फिल्टर प्रदान करताना अनिल पाटील. शेजारी सुनीता पाटील, विकास पाटील आदी उपस्थित होते.

क्रमांक : ०२०४२०२१-गड-०१

Web Title: Water filter visit to Hiddugi Primary School