शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन; आजऱ्यातील धरणांमध्ये ६५ टक्के पाणीसाठा शिल्लक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 19:11 IST

शेती व पिण्यासाठी जूनअखेर पाणी पुरेल असे नियोजन पाटबंधारे विभागाने केले

शीतल मोरेआजरा : आजरा तालुक्यातील सर्वच धरणांमध्ये ६५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. शेती व पिण्यासाठी जूनअखेर पाणी पुरेल असे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे. सर्वच धरणातून पाण्याची दोन आवर्तने पूर्ण केले असून तिसरे आवर्तन सुरू आहे. मात्र सध्या वाढलेल्या उष्णतेमुळे दररोज धरणातून ३ ते ४ दलघफू पाण्याचे बाष्पीभवन होत आहे.पावसाळ्यात आजरा तालुक्यात प्रतिचेरापुंजीपेक्षा जास्त पाऊस पडतो. पाणी अडविण्यासाठी गेल्या ३० वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. चालूवर्षी सर्व धरणांमध्ये १०० टक्के पाणी साठा झाला आहे. धरणातील पाणी जवळपास १२ ते १३ हजार हेक्टर क्षेत्राला तर अनेक गावच्या पाणी योजना या धरणातील पाण्यावर अवलंबून आहेत. पाटबंधारे विभागाने सर्वच धरणातून पाण्याची दोन आवर्तने पूर्ण केली असून तिसरे आवर्तन सुरू आहे. धरणातील पाण्यामुळे तालुक्यातील हिरण्यकेशी, चित्री, आंबेओहोळ, तारओहोळ या नद्यांमध्ये बारा महिने पाणी आहे. मात्र वाढलेल्या उष्णतेमुळे बाष्पीभवनाद्वारे पाण्याचे साठे झपाट्याने कमी होत आहेत.धरणातील सध्याचा पाणीसाठा असाचित्री - ६६ टक्केउचंगी - ६५ टक्केआंबेओहोळ - ८१ टक्केसर्फनाला - ७३ टक्केएरंडोळ - ६७ टक्केधनगरवाडी - ५० टक्केखानापूर - ५० टक्के

पाणी अडविण्यासाठी कोल्हापूर पद्धतीचे बंधारेचित्री - ५, सर्फनाला - ६, उचंगी - १२, आंबेओहोळ -७, धनगरवाडी - २ असे ३२ बंधारे बांधण्यात आले आहेत. सर्व बंधाऱ्यातून पाणी अडविल्यामुळे बंधारे तुडुंब आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Water evaporates due to heat; dams hold 65% capacity.

Web Summary : Despite good rainfall, Azara dams have 65% water due to evaporation. Irrigation is planned until June, with three cycles completed. Increased heat rapidly depletes water reserves in dams and rivers.