शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

कोगनोळी येथील अवैध वाहतुकीबाबत राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 17:48 IST

road safety Kognoli Karnatka -कोगनोळी येथील अवैध वाहतूक कायमची बंद व्हावी, जर ही अवैध वाहतूक दहा दिवसात बंद झाली नाही तर राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात येईल, असा इशारा कोगनोळी ग्रामस्थ व पत्रकार संघाच्या वतीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना देण्यात आला.

ठळक मुद्दे कोगनोळी येथील अवैध वाहतुकीबाबत राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा इशाराजिल्हाधिकार्‍यांना निवेदन; दिला दहा दिवसांचा अल्टिमेटम

बाबासो हळिज्वाळेकोगनोळी : कोगनोळी मधील महामार्गावरील टोल नाका चुकवण्यासाठी कोगनोळी मार्गे अवैध वाहतुकीचा सुळसुळाट झाला होता. या वाहतुकीमुळे अनेकांचा बळी गेलेला आहे. या पार्श्वभूमीवर कोगनोळी येथील अवैध वाहतूक कायमची बंद व्हावी, जर ही अवैध वाहतूक दहा दिवसात बंद झाली नाही तर राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात येईल, असा इशारा कोगनोळी ग्रामस्थ व पत्रकार संघाच्या वतीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना देण्यात आला.या निवेदनाच्या प्रती प्रांताधिकारी, तहसीलदार, मंडल पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांनाही देण्यात आलेले आहेत. या निवेदनावर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंकज पाटील, प्राथमिक कृषी पत्तीन संघाचे चेअरमन अनिल चौगुले, माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब कागले, माजी ग्रामपंचायत सदस्य मारुती कोळेकर, कृष्णात खोत, युवराज कोळी यांच्यासह अनेक शेकडो नागरिकांच्या सह्या आहेत.याबाबत अधिक माहिती अशी, की राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाका चुकविण्यासाठी चार चाकी खाजगी वाहनांपासून सोळा चाकी अवजड वाहनांपर्यंत सर्वच वाहने कोगनोळी गावातून प्रवास करतात. याच मार्गावर अनेक शाळा, आठवडी बाजार, विद्यार्थी, शेतकरी व नागरिकांची ये-जा सुरू असते.

काही दिवसांपूर्वीच एका तरुणाचा या अवैध वाहतुकीमुळे बळी गेला. त्यामुळे ही अवैध वाहतूक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या अवैध वाहतुकीबाबत नागरिकांतून तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. याचीच दखल घेऊन कोगनोळी ग्रामस्थांच्या वतीने व पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांना लेखी निवेदन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.यासाठी प्रशासकीय अधिकारी, पोलीस प्रशासन, लोकप्रतिनिधी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दहा दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला असून या दहा दिवसात ही अवैध वाहतूक बंद झाली नाही, तर राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात येईल असा इशाराही ग्रामस्थांच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

यावेळी जिल्हाधिकारी यांनी योग्य ती कार्यवाही करून अवैध वाहतूक रोखण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले. यावेळी तात्यासाहेब कागले, पूनम डांगरे, राजू शिंत्रे, कृष्णात भोजे, संजय पाटील यांच्यासह कोगनोळी पत्रकार संघाचे विठ्ठल कोळेकर, अनिल नवाळे, बाबासो हळिज्वाळे, राहुल मिस्त्री आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाTrafficवाहतूक कोंडीKarnatakकर्नाटकbelgaonबेळगावkolhapurकोल्हापूर