रस्त्यासाठी आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:19 IST2021-06-02T04:19:26+5:302021-06-02T04:19:26+5:30

अशा आशयाचे निवेदन अधीक्षक अभियंता संभाजीराव माने यांना दिले आहे. निवेदनातील आशय असा, सध्या या रस्ताचे रुंदीकरण व ...

A warning of agitation for the road | रस्त्यासाठी आंदोलनाचा इशारा

रस्त्यासाठी आंदोलनाचा इशारा

अशा आशयाचे निवेदन अधीक्षक अभियंता संभाजीराव माने यांना दिले आहे.

निवेदनातील आशय असा, सध्या या रस्ताचे रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम सुरू असून, हे काम करणाऱ्या कंपनीने रस्ता रुंदीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर धोकादायक उत्खनन केले आहे. त्यामुळे डोंगराला काही ठिकाणी ५० मीटर लांबीच्या भेगा पडलेल्या असून, याठिकाणी केव्हाही दरड कोसळून अनर्थ घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या दोन पावसाळ्यांत या घाटात सतत दरडी कोसळण्याचा घटना घडत होत्या. या घाटात धोकादायक वळणे आहेत.

सध्या या मार्गावर लहानमोठ्या वाहनांच्या वाहतुकीची वर्दळ सुरू असते तसेच शेतकरी वर्गाची नेहमी याठिकाणी ये-जा सुरू असते.

पावसाळ्याचा तोंडावर जर भेग पडलेला भराव नाही काढला, तर हा भराव रस्तावर येऊन अनर्थ घडण्याची व वाहतूकही पूर्णपणे बंद होण्याची शक्यता आहे.

डोंगराचा भेग पडलेला भराव काढून घेऊन संरक्षक भिंत बांधावी व होणारा अनर्थ टाळावा.

सोळांकूर ते नरतवडे, तसेच राधानगरी ते न्यू करंजे दरम्यान रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. खडी उखडल्याने या रस्त्यावरून जाताना प्रवाशांना कसरत करावी लागते. या रस्त्यावर अनेक अपघात झाले आहेत. पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण करावे, अन्यथा ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

फोटो ओळ- अधीक्षक अभियंता संभाजीराव माने यांना निवेदन देताना ए. वाय. पाटील.

Web Title: A warning of agitation for the road